रत्नागिरीत आंबा बागायतदारांनी केलेल्या आंदोलनात शासनाला दिली चेतावणी
कोरोनाचे संकट, चक्रीवादळे अशा नैसर्गिक दुष्टचक्रामध्ये अडकलेले बागायतदार मोठ्या आर्थिक संकटात आहेत.
कोरोनाचे संकट, चक्रीवादळे अशा नैसर्गिक दुष्टचक्रामध्ये अडकलेले बागायतदार मोठ्या आर्थिक संकटात आहेत.
‘काहीच खत न घालता भाजीपाला मिळेल का ?’, अशी शंका मनात होती. आता गेले वर्षभर ‘सुभाष पाळेकर कृषी’ तंत्राने लागवड केल्यावर ही शंका पूर्णपणे मिटली. या प्रक्रियेत आम्ही आमच्या लागवडीत केलेले प्रयत्न आणि शिकायला मिळालेली सूत्रे येथे दिली आहेत.
गोंदिया आणि गडचिरोली जिल्ह्यांत हत्तींचा त्रास वाढला आहे. केरळ, कर्नाटक, तमिळनाडू, आसाम आदी राज्यांतून हत्ती महाराष्ट्रात येत आहेत. गोंदियामध्ये हत्तींनी मोठ्या प्रमाणात धानशेतीची हानी केली आहे. शेतीच्या अवजारांसह हत्ती घरांचीही हानी करत आहेत.
शेतकर्यांना पीकहानी भरपाई तातडीने मिळावी, पंचनामे लवकरात लवकर व्हावे, यासाठी भ्रमणभाषद्वारे ‘ई-पंचनामे’ करण्याचे ‘ॲप’ विकसित करण्याचे काम चालू आहे.
विदर्भातील सतत पडणार्या पावसामुळे बाधित शेतकर्यांना राज्यशासनाने प्रथमच ७५० कोटी रुपयांचे साहाय्य दिले आहे, अशी माहिती मंत्री उदय सामंत यांनी २२ डिसेंबर या दिवशी विधान परिषदेत लक्षवेधी सूचनेला उत्तर देतांना दिली.
अतीवृष्टीमुळे मिळणार्या अनुदानापासून वगळण्यात आलेल्या गावांविषयी सदस्य नारायण कुचे यांनी २१ डिसेंबर या दिवशी लक्षवेधी सूचना उपस्थित केली होती. तिला उत्तर देतांना उपमुख्यमंत्री बोलत होते.
पालापाचोळा कुजून बनणारी भुसभुशीत सुपीक माती (ह्यूमस) झाडांच्या वाढीसाठी अत्यंत उपयुक्त असते. झाडांना अन्नद्रव्ये पुरवणारा तो सर्वाेत्तम स्रोत आहे.
डॉ. विजय आठवले यांनी शेतकरी आणि शेतीपूरक व्यवसाय वृद्धींगत होण्याच्या दृष्टीने ‘भ्रमणभाष अॅप’ सिद्ध केले आहे. या ‘अॅप’द्वारे शेतकर्यांना संपूर्ण माहिती एका ‘क्लिक’वर मिळणार आहे.
झाडांना उपजतच असलेली ही प्रतिकारक शक्ती नेहमी कार्यरत ठेवण्याचे काम पालापाचोळा इत्यादी कुजून बनलेली सुपीक माती (ह्यूमस) करते.
जिल्ह्यातील शेतीची अवजारे आणि विद्युत् जनित्रामधील सुटे भाग यांच्या चोरीची प्रकरणे वाढली. त्यामुळे जिल्हा ग्रामीण पोलिसांनी भंगाराच्या १२४ दुकानांची पडताळणी केली. त्यात नांदगाव खंडेश्वर येथील फिरोज खान यांच्या भंगार दुकानात पोलीस तक्रारीप्रमाणे शेतीचा माल मिळाला.