रासायनिक शेती केवळ मानवी आरोग्याची नाही, तर निसर्गाचीही मोठी हानी करते !

सनातनची ‘घरोघरी लागवड’ मोहीम : लेखांक ८१

सौ. राघवी कोनेकर

‘रासायनिक शेतीतील पिके मानवी आरोग्यासाठी हानीकारक आहेतच; परंतु ही रसायने शेतातील अनेक सूक्ष्म जीव-जंतू, पाणी आणि हवा यांचीही हानी करतात. रसायनांच्या सततच्या वापराने मातीतील उपयुक्त सूक्ष्म जीवाणू मरतात आणि भूमीची सुपीकता घटत जाऊन ती नापीक होते. रासायनिक फवारण्यांमुळे शत्रू कीटकांच्या समवेत मित्र कीटकही मारले जातात अन् निसर्गातील जैवविविधतेची मोठी हानी होते. रासायनिक खते आणि विषारी कीटकनाशके पाण्यात मिसळून शेतातून वाहून पाण्याच्या मुख्य स्रोतात मिसळतात अन् जलप्रदूषण होते. रासायनिक खते शेतात पसरल्यावर त्यांचा हवेशी संयोग झाला की, मोठ्या प्रमाणात त्यांतील कर्ब (कार्बन) मोकळा होऊन हवेत मिसळतो आणि वायूप्रदूषण होते. अशा प्रकारे रासायनिक शेती सर्वार्थांनी हानीकारकच आहे.’

– सौ. राघवी मयूरेश कोनेकर, ढवळी, फोंडा, गोवा. (९.२.२०२३)

तुम्हाला ही लेखमालिका कशी वाटली, हे पुढील ई-मेल वर आम्हाला कळवा !

[email protected]