रोपांवर जीवामृत आणि ताक यांची एकत्रित फवारणी करण्‍याचे लाभ

सनातनची ‘घरोघरी लागवड’ मोहीम : लेखांक ७९

जीवामृत आणि ताक यांची एकत्रित फवारणी

‘सुभाष पाळेकर कृषी’तंत्राने लागवड करतांना जीवामृत मातीत देण्‍यासह त्‍याची रोपांवर फवारणी करणेही महत्त्वाचे आहे. १ लिटर पाण्‍यात ७५ मि.ली. गाळलेले जीवामृत आणि त्‍यात २५ मि.ली. गाळलेले आंबट ताक मिसळून त्‍याची सर्व रोपांवर फवारणी करावी. फवारणीसाठी तुषार सिंचनाच्‍या (स्‍प्रेच्‍या) बाटलीचा उपयोग करावा. ही फवारणी १० ते १५ दिवसांच्‍या अंतराने करावी.

सौ. राघवी कोनेकर

जीवामृत आणि ताक यांच्‍या फवारणीमुळे पुढील लाभ होतात –

अ. जीवामृत हे उत्तम बुरशीनाशक, जंतूरोधक आणि विषाणूनाशक आहे.
आ. जीवामृत फवारल्‍याने पानांचा आकार वाढतो आणि परिणामी अन्‍ननिर्मिती अधिक होऊन उत्‍पादन वाढते. पानांची सौरऊर्जा ग्रहण करण्‍याची क्षमता वाढते.
इ. आंबट ताक हेसुद्धा उत्तम बुरशीनाशक आणि जंतूरोधक आहे. त्‍यामुळे या फवारणीने झाडांची रोगप्रतिकारक शक्‍ती वाढते.’

– सौ. राघवी मयूरेश कोनेकर, ढवळी, फोंडा, गोवा. (८.२.२०२३)

तुम्‍हाला ही लेखमालिका कशी वाटली, हे आम्‍हाला कळवा !
[email protected]