रसायनांच्‍या फवारण्‍यांचे आरोग्‍यावर होणारे दुष्‍परिणाम

सनातनची ‘घरोघरी लागवड’ मोहीम : लेखांक ७२

घातक रसायनांचे दुष्परिणाम

‘शेतात रसायने फवारतांना शेतकर्‍यांना आपले नाक, तोंड झाकून घ्‍यावे लागते. काही वेळा तर संपूर्ण शरीर झाकणारे निराळे कपडे घालून ही फवारणी केली जाते. जी रसायने केवळ हुंगली, तरी मनुष्‍य बेशुद्ध होऊ शकतो किंवा मळमळणे, उलटी होणे असे त्रास होऊ शकतात, ती आरोग्‍यास अपायकारक आहेत, हे निश्‍चितच आहे.

सौ. राघवी कोनेकर

यांची फवारणी केलेली फळे, तसेच भाज्‍या कितीही धुतल्‍या, तरी त्‍या रसायनांचे विषारी परिणाम नष्‍ट होत नाहीत. त्‍यामुळे ‘स्‍वतः विषमुक्‍त अन्‍न पिकवणे’ किंवा ‘विषमुक्‍त शेती करणारे विश्‍वासू शेतकरी शोधून त्‍यांच्‍याकडून भाजीपाला विकत घेणे’, हेच पर्याय शिल्लक रहातात.’

– सौ. राघवी मयूरेश कोनेकर, ढवळी, फोंडा, गोवा. (३०.०१.२०२३)

तुम्‍ही घरच्‍या घरी विषमुक्‍त भाजीपाला पिकवता का ? आम्‍हाला कळवा !
[email protected]