रत्नागिरी – प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या अंतर्गत पात्र लाभार्थी शेतकर्यांना १९ व्या हप्त्याचा लाभ देण्यात येणार आहे. कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालय, भारत सरकार यांच्या वतीने बिहार राज्यातील भागलपूर येथे २४ फेब्रुवारी या दिवशी होणार्या भव्य ‘किसान सन्मान समारोह संमेलना’त याचा प्रारंभ करण्यात येणार आहे.
या कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण जिल्ह्यातील सर्व नागरी सेवा केंद्रांवर https://pmindiawebcast.nic.in या लिंकद्वारे करण्यात येणार आहे . जिल्ह्यातील जवळपास १ लाख ६० सहस्र शेतकर्यांना एकूण अंदाजे ३२ कोटी रुपये मिळणार आहेत. जिल्ह्यातील अधिकाधिक शेतकर्यांनी कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण पहावे, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शिवकुमार सदाफुले यांनी केले आहे.