रत्नागिरी (जि.मा.का.) – युरोपियन युनियन आणि इतर देशांत आंबा निर्यातीसाठी अपेडाच्या ‘मँगोनेट’ प्रणालीद्वारे निर्यातक्षम आंबा बागांची नोंदणी केली जाते. वर्ष २०२४-२५ मध्ये आतापर्यंत जिल्ह्यातून २ सहस्र ७५ निर्यातक्षम आंबा बागांची नोंदणी झाली आहे. निर्यातक्षम आंबा बागांची ‘मँगोनेट’ या ऑनलाईन प्रणालीवर नोंदणी करण्याचा अंतिम दिनांक ३१ डिसेंबर होता, तो आता २८ फेब्रुवारीपर्यंत वाढवण्यात आला आहे. त्यामुळे उर्वरित कालावधीत विशेष मोहीम राबवून निर्यातक्षम आंबा बागांची नोंदणी कृषी विभागाद्वारे करण्यात येत आहे.