
पालघर – येथील वाडा, मोखाडा या तालुक्यांत अवेळी पावसामुळे शेतकर्यांची घरे, तसेच आंबा, चिकू या फळबागांसह इतर शेतीपिकांची पुष्कळ हानी झाली. वादळी वार्याने अनेक ठिकाणच्या घरांची हानी झाली. वीजपुरवठा खंडित झाला. शेतकर्यांनी सरकारकडे हानीभरपाई मागितली आहे. यासंदर्भात प्रशासनाकडून पंचनामे करण्यात येत आहेत.