कठोर अधिकार दिलेल्या ‘ईडी’वर लगाम घातला नाही, तर कुणीच सुरक्षित रहाणार नाही ! – हरीश साळवे, ज्येष्ठ अधिवक्ता

‘ईडी’, म्हणजेच अंमलबजावणी संचालनालयाला कठोर अधिकार देण्यात आले आहेत. त्यांच्या अधिकारांवर लगाम घालणे आवश्यक आहे, अन्यथा व्यक्तीगत स्वातंत्र्यावर गदा येईल, असे वक्तव्य वरिष्ठ अधिवक्ता हरीश साळवे यांनी सर्वोच्च न्यायालयात केले.

५०० कोटी रुपयांच्या बेहिशोबी रकमेच्या प्रकरणी ‘ईडी’च्या माजी अधिकार्‍याला ईडीकडून अटक !

अशा भ्रष्टाचार्‍यांना फाशीचीच शिक्षा होण्यासाठी कायदा करणे आवश्यक आहे !

सांगली येथे व्यावसायिकाच्या बंगल्यावर ‘ईडी’ची धाड !

आर्थिक आणि व्यवसायातील अनियमितता या संशयावरून ही कारवाई झाल्याची चर्चा आहे. या अन्वेषणाची कोणतीही अधिकृत माहिती देण्यास ‘ईडी’च्या अधिकार्‍यांनी नकार दिला आहे.

कोरोनाच्‍या केंद्रांत लोकांच्‍या जिवाशी खेळण्‍यात आले ! – देवेंद्र फडणवीस, गृहमंत्री

कोरोना केंद्रांसाठी घोटाळा प्रकरणी ‘ईडी‘ने ठिकठिकाणी धाडी घातल्‍याच्‍या पार्श्‍वभूमीवर गृहमंत्री देवेंद्र फडणवीस पत्रकारांशी बोलतांना म्‍हणाले की, अंमलबजावणी संचालनालयाने (‘ईडी’ने) मुंबईत १५ ठिकाणी धाडी घातल्‍या आहेत.

मुंबई येथे कोविड केंद्रातील घोटाळा प्रकरणी १६ हून अधिक ठिकाणी ‘ईडी’च्‍या धाडी !

मुंबई महापालिकेने ऑक्‍टोबर २०२२ मध्‍ये सुजित पाटकर यांच्‍या ‘लाईफलाईन हॉस्‍पिटल मॅनेजमेंट सर्व्‍हिसेस’ला ५ कोविड केंद्रांचे कंत्राट दिले होते; मात्र मुंबई महापालिकेने कंत्राट दिले, त्‍या वेळी हे आस्‍थापन अस्‍तित्‍वात नव्‍हते, तसेच ती नोंदणीकृत फर्म नसल्‍याचाही आरोप आहे.

अमृता फडणवीस यांना ब्लॅकमेल करणार्‍या अनिल जयसिंघानी याची ३.४० कोटींची मालमत्ता जप्त !

सौ. अमृता फडणवीस यांना ‘ब्लॅकमेल’ करणार्‍या अनिल जयसिंघानी याची अनुमाने ३.४० कोटी रुपयांची मालमत्ता जप्त केली आहे. ‘ईडी’ने पी.एम्.एल्. प्रकरणी ही कारवाई केली आहे.

तमिळनाडूचे उर्जामंत्री सेंथिल बालाजी यांना अटक केल्यावर त्यांच्या छातीत दुखू लागले !

कारागृहात जाण्यापासून वाचण्यासाठी अटक करण्यात आलेल्या राजकारण्यांना हमखास होणारा आजार ! अशांवर कारवाई होणे आवश्यक !

छत्रपती संभाजीनगर येथील पंतप्रधान आवास योजना घोटाळ्‍याप्रकरणी कृषी आयुक्‍तांना ‘ईडी’ची नोटीस !

पंतप्रधान आवास योजना घोटाळ्‍यात अंमलबजावणी संचालनालयाने (‘ईडी’ने) तत्‍कालीन जिल्‍हाधिकारी तथा कृषी आयुक्‍त सुनील चव्‍हाण यांना चौकशीसाठी नोटीस बजावली आहे. या घरकुल योजनेत १ सहस्र कोटींचा भ्रष्‍टाचार झाल्‍याचा आरोप झाला होता.

काँग्रेसचे खासदार बाळू धानोरकर यांच्या मेहुण्याची ‘ईडी’द्वारे चौकशी !

सक्तवसुली संचालनालयाने (‘ईडी’ने) काँग्रेसचे खासदार बाळू धानोरकर यांच्या पत्नी आमदार सौ. प्रतिभा धानोरकर यांचे बंधू प्रवीण काकडे यांच्याविरुद्ध भद्रावती पोलीस ठाण्यात प्रविष्ट झालेल्या आर्थिक अपव्यवहार प्रकरणाची माहिती मागवली आहे. ‘ईडी’चे पथक या प्रकरणाच्या अन्वेषणासाठी येथे येणार आहे.

अंमलबजावणी संचालनालयाकडून जयंत पाटील यांना दुसर्‍यांदा समन्स !

पाटील यांना २२ मे या दिवशी चौकशीसाठी कार्यालयात उपस्थित रहाण्याचा आदेश अंमलबजावणी संचालनालयाकडून देण्यात आला आहे.