५०० कोटी रुपयांच्या बेहिशोबी रकमेच्या प्रकरणी ‘ईडी’च्या माजी अधिकार्‍याला ईडीकडून अटक !

(ईडी म्हणजे अंमलबजावणी संचालनालय)

मुंबई – अंमलबजावणी संचालनालयाने (‘ईडी’ने) त्याच्याच एका माजी अधिकार्‍याला अटक केली आहे. सचिन सावंत असे याचे नाव असून तो सध्या सीमा शुल्क आणि अप्रत्यक्ष कर विभागात अतिरिक्त आयुक्त पदावर कार्यरत आहे. ईडीने सावंत याच्या निवासस्थानावर धाड टाकली. ५०० कोटी रुपये अनधिकृतरित्या वळवण्याच्या एका प्रकरणातील आरोपीने सचिन सावंत याच्या विरोधात तक्रार प्रविष्ट केली होती.

संपादकीय भूमिका

अशा भ्रष्टाचार्‍यांना फाशीचीच शिक्षा होण्यासाठी कायदा करणे आवश्यक आहे !