कठोर अधिकार दिलेल्या ‘ईडी’वर लगाम घातला नाही, तर कुणीच सुरक्षित रहाणार नाही ! – हरीश साळवे, ज्येष्ठ अधिवक्ता

ज्येष्ठ अधिवक्ता हरीश साळवे यांचे सर्वोच्च न्यायालयात वक्तव्य

ज्येष्ठ अधिवक्ता हरीश साळवे

नवी देहली – ‘ईडी’, म्हणजेच अंमलबजावणी संचालनालयाला कठोर अधिकार देण्यात आले आहेत. त्यांच्या अधिकारांवर लगाम घालणे आवश्यक आहे, अन्यथा व्यक्तीगत स्वातंत्र्यावर गदा येईल, असे वक्तव्य वरिष्ठ अधिवक्ता हरीश साळवे यांनी सर्वोच्च न्यायालयात केले. ते आरोपी पक्ष असलेल्या ‘एम्३एम्’ या भूमीच्या खरेदी-विक्रीशी संबंधित आस्थापनाच्या बाजूने एका सुनावणीच्या वेळी बोलत होते.