मीरा-भाईंदर महानगरपालिकेच्‍या आयुक्‍तांना ‘ईडी’ची नोटीस !

मीरा-भाईंदर महानगरपालिकेचे आयुक्‍त दिलीप ढोले यांना आर्थिक अपहाराच्‍या प्रकरणात अंमलबजावणी संचालनालयाकडून समन्‍स देण्‍यात आला आहे. ठाणे येथील बांधकाम व्‍यावसायिकाशी एका कथित आर्थिक घोटाळ्‍याच्‍या प्रकरणात जबाब नोंदवण्‍यासाठी हा समन्‍स पाठवण्‍यात आला आहे. 

कोरोना महामारीच्‍या काळात मुलुंड कोविड केंद्रात १०० कोटींचा घोटाळा !

उद्धव ठाकरे यांच्‍या नेत्‍याने १०० कोटी रुपयांचा घोटाळा केला आहे’, असा दावा करून ‘या घोटाळ्‍याची चौकशी करण्‍यात यावी’, अशी मागणी भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्‍या यांनी ट्‍विटरद्वारे ८ ऑगस्‍ट या दिवशी केली आहे.

तमिळनाडूचे मंत्री सेंथिल बालाजी यांची अटक कायदेशीर ! – सर्वोच्च न्यायालय

सर्वोच्च न्यायालयाने अंमलबजावणी संचालनालयाला  मंत्र्याची कोठडीत चौकशी करण्याची अनुमती दिली.

‘ईडी’ने प्रतिबंधित संघटना ‘पी.एफ्.आय.’ची २.५३ कोटी रुपयांची अचल संपत्ती केली जप्त !

बंदी लादण्यात आलेल्या जिहादी आतंकवादी संघटना ‘पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया’च्या कोट्यवधी रुपयांची संपत्ती ५ ऑगस्ट या दिवशी जप्त करण्यात आली. अंमलबजावणी संचालनालयाने (ईडीने) केलेल्या या कारवाईमध्ये केरळ राज्यातील २.५३ कोटी रुपयांच्या अचल संपत्तीचा समावेश आहे.

माजी महापौरांसह अधिकार्‍यांवर गुन्हा नोंद !

मुंबईत शवपिशव्या खरेदी घोटाळा प्रकरण

संजयकुमार मिश्रा यांच्‍या ‘ईडी’च्‍या संचालकपदाचा कार्यकाळ १५ सप्‍टेंबरपर्यंत वाढवला !

‘ईडी’, म्‍हणजेच अंमलबजावणी संचालनालयाचे संचालक संजयकुमार मिश्रा यांच्‍या कार्यकाळात १५ सप्‍टेंबरपर्यंत वाढ करण्‍याची अनुमती सर्वोच्‍च न्‍यायालयाने दिली आहे. केंद्रशासनाने न्‍यायालयाकडे याविषयीची मागणी केली होती.

लाचखोर शिक्षणाधिकारी सुनीता धनगर यांची ‘ईडी’कडून चौकशी होणार !

ही प्रकरणे वर्ष २००७ पासूनची आहेत. यांतील ४० पैकी ३३ जणांवर आरोपपत्र प्रविष्ट करण्यात आले आहे. आणखी ५ जणांवर लवकरच आरोपपत्र प्रविष्ट करण्यात येईल. अनधिकृत तुकड्यांना मान्यता देणे, चुकीचे शालार्थ ‘आयडी’ देणे आदी प्रकार या प्रकरणात झाले आहेत.

‘ईडी’ने साई रिसॉर्टला ठोकले टाळे !

ईडीने (अंमलबजावणी संचालनालयाने) तालुक्यातील मुरुड येथील साई रिसॉर्टला १९ जुलै या दिवशी टाळे ठोकले. शिवसेनेचे (ठाकरे गटाचे) माजी मंत्री अनिल परब आणि सदानंद कदम यांच्याशी संबंधित साई रिसॉर्टच्या बांधकामात ‘सी.आर्.झेड.’ कायद्याचे उल्लंघन झाल्याचा आरोप आहे.

ईडीकडून भागीदार सुजित पाटकर यांच्‍यासह एका आधुनिक वैद्याला अटक !

कोविड केंद्र गैरव्‍यवहार प्रकरणी अंमलबजावणी संचालनालयाने लाईफ लाईन मॅनेजमेंट आस्‍थापनाचे भागीदार सुजित पाटकर यांच्‍यासह एका आधुनिक वैद्य किशोर बिसुरे यांना अटक केली.

‘सेवा विकास बँके’चे माजी संचालक ‘ईडी’च्‍या कह्यात !

येथील सेवा विकास बँकेचे माजी संचालक आणि माजी उपमहापौर अमर मूलचंदानी यांना अंमलबजावणी संचालनालयाने (‘ईडी’ने) कह्यात घेतले आहे. मुंबईतील विशेष न्‍यायालयाने त्‍यांना ७ जुलैपर्यंत इडी कोठडीत ठेवण्‍याचे आदेश दिले आहेत.