193 ED Cases Against Politicians : गेल्या १० वर्षांत ‘ईडी’कडून १९३ नेत्यांवर गुन्हे नोंद

केवळ २ जणांवरील आरोप सिद्ध

नवी देहली – गेल्या १० वर्षांत, म्हणजे १ एप्रिल २०१५ ते २८ फेब्रुवारी २०२५ या कालावधीत अंमलबजावणी संचालनालयाने (‘ईडी’ने) तब्बल १९३ राजकीय नेत्यांविरुद्ध आर्थिक गैरव्यवहाराचे गुन्हे नोंदवले आहेत; मात्र त्यांतील केवळ दोघांवरील आरोप अद्याप सिद्ध झाले. केंद्रीय राज्यमंत्री पंकज चौधरी यांनी संसदेत लेखी उत्तरात ही माहिती दिली. मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे खासदार ए.ए. रहीम यांनी या संदर्भात प्रश्‍न विचारला होता.

रहीम यांनी राज्य आणि पक्ष निहाय गुन्ह्यांची इत्यंभूत माहिती मागितली होती. यावर राज्य आणि पक्ष निहाय नोंदी ठेवल्या जात नसल्याची माहिती सरकारकडून देण्यात आली.