‘पहिले पाऊल – शाळापूर्व तयारी’ अभियानात सर्वांनी सहभागी व्‍हावे ! – शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांचे आवाहन

राज्‍य शासनाकडून आदर्श माता घरोघरी घडवण्‍याचे काम ‘पहिले पाऊल- शाळापूर्व तयारी’ अभियानांतर्गत चालू आहे.

‘आदर्श शाळा पुरस्कार’प्राप्त आचरा केंद्रशाळेत शिक्षकांची पदे रिक्त

‘केंद्रशाळा आचरा क्रमांक १’ या शाळेतील शिक्षकांची रिक्त पदे भरण्याच्या मागणीकडे प्रशासन सातत्याने दुर्लक्ष करत आहे, असा आरोप करत शिक्षकांची पदे न भरल्यास नव्या शैक्षणिक वर्षापासून शाळा बंद ठेवण्याची संतप्त भूमिका शाळा व्यवस्थापन समितीने घेतली आहे

राष्ट्रीय शैक्षणिक धोरण लागू करणारे गोवा हे पहिले राज्य असेल ! – मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत

मुख्यमंत्र्यांनी ‘गुरुकुल विश्व ॲप’चे लोकार्पण केले. या ॲपमुळे पूर्वप्राथमिक शाळांची नोंदणी करणे सुविधाजनक तसेच ऑनलाईन नोंदणीद्वारे पूर्वप्राथमिक शाळांना अनुमती देणे सहज शक्य होणार आहे.

छत्रपती संभाजीनगर येथील बामू विद्यापिठातील प्राध्‍यापकाने केला विद्यार्थिनीवर बलात्‍कार !

असे वासनांध प्राध्‍यापक विद्यार्थ्‍यांना काय घडवत असणार ? अशा प्राध्‍यापकांना बडतर्फ करून कठोर शिक्षाच करायला हवी !

शिक्षणसंस्‍थांशी संबंधित कामात दिरंगाई झाल्‍यास अधिकार्‍यांच्‍या पदोन्‍नतीच्‍या वेळी विचार करणार !

शासकीय शाळांमधील शिक्षकांचे स्‍थानांतर, शाळांचे विविध प्रस्‍ताव आदी कामे त्‍या त्‍या वेळी पूर्ण न केल्‍यास सरकारी अधिकारी किंवा कर्मचारी यांच्‍या ‘सर्व्‍हिस बूक’मध्‍ये त्‍याची नोंद करण्‍यात येईल आणि पदोन्‍नतीच्‍या वेळी या गोष्‍टी लक्षात घेतल्‍या जातील

शासकीय शाळांमध्ये पाठ्यपुस्तकांसह गणवेश, बूट आणि वह्या शासनाकडून मिळणार ! – शिक्षणमंत्री दीपक केसरकर

राज्यातील सर्व शासकीय शाळांतील विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तकांसह गणवेश, बूट आणि वह्या शासनाकडून दिल्या जाणार आहेत. इयत्ता १ ते ८ वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना हे साहित्य दिले जाणार असून येत्या शैक्षणिक वर्षापासून यावर कार्यवाही होणार आहे.

गोव्यात वर्ष २०१४ पासून १०२ सरकारी प्राथमिक शाळा बंद

वर्ष १९७८ पासून मागील ३५ वर्षांत ३८४ सरकारी प्राथमिक शाळा बंद पडल्या आहेत. शासकीय माहितीनुसार वर्ष २०१४ मध्ये राज्यात ८२२ सरकारी प्राथमिक शाळा होत्या.

तुंग (जिल्हा सांगली) येथील मुख्याध्यापिका आणि सनातनच्या साधिका सौ. पौर्णिमा गडकरी यांच्या लिखाणाला ‘सर्वाेत्तम लेख’ म्हणून राज्यात प्रथम क्रमांकाने सन्मान !

राज्यस्तरीय शिक्षकांसाठीच्या स्पर्धेत मुख्याध्यापिका सौ. पौर्णिमा गडकरी यांनी ‘शाळेमध्ये लहान मुलांशी आदर्श संवाद कसा साधला जावा ?’, या विषयावर लिखाण केले होते.

ब्रिटनमधील शाळांमध्ये हिंदु विद्यार्थ्यांवर मुसलमान विद्यार्थ्यांकडून धर्मांतरासाठी धमक्या !

ब्रिटनच्या शाळांमध्ये घडणार्‍या घटना उद्या भारतातील शाळांमध्येही घडू लागल्या, तर आश्‍चर्य वाटू नये !

शुल्‍क भरले नाही म्‍हणून निकाल रोखल्‍यास शाळांवर कारवाई करणार ! – शिक्षण विभाग

अडवणूक शाळांना करता येणार नाही, अन्‍यथा शिक्षण अधिकार्‍यांच्‍या साहाय्‍याने त्‍यांच्‍यावर कारवाई करणार असल्‍याची चेतावणी शिक्षण विभागाने दिली आहे.