सिंधुदुर्ग : सेवानिवृत्त प्राथमिक शिक्षकांना सेवेत घेण्याच्या निर्णयामुळे डी.एड्. बेरोजगार संतप्त

डी.एड्. पदविकेत मिळवलेली गुणवत्ता असतांना पुन:पुन्हा गुणवत्ता का तपासली जात आहे ? केवळ  परीक्षांचा मांडलेला खेळ, १० वर्षांत परीक्षांसाठी शुल्क आकारून  भरलेली तिजोरी, प्रमाणपत्रांचा उघड झालेला भ्रष्टाचार यामुळे आता कुणाचाच परीक्षांवर विश्‍वास राहिलेला नाही.

गोव्यात १२ वीचा निकाल ९५.४६ टक्के

बारावीच्या परीक्षेचा सविस्तर निकाल https://results.gbshse.net/#/  आणि https://www.gbshse.in/ या संकेतस्थळांवर उपलब्ध आहे.

शिक्षण खाते कोंकणी आणि मराठी भाषांतील पूर्वप्राथमिक शाळांना प्राधान्याने अनुमती देणार !

‘‘इंग्रजी पूर्वप्राथमिक शाळांना अनुमती देण्यास आमचा विरोध नाही. आमची केवळ राज्यातील कोणत्याही इंग्रजी शाळांना अनुमती देऊ नये, हीच प्रमुख मागणी आहे.’’

कांदळवन आणि सागरी जैव विविधता यांच्‍या उच्‍च शिक्षणासाठी राज्‍यशासनाकडून मिळणार शिष्‍यवृत्ती !

जगभरातील सर्वोत्‍कृष्‍ट विद्यापिठांत जाऊन याविषयी संशोधन करण्‍यासाठी २५ मुलांना ३ वर्षांसाठी ही शिष्‍यवृत्ती दिली जाणार आहे. ३ मे या दिवशी झालेल्‍या मंत्रीमंडळाच्‍या बैठकीत हा निर्णय घेण्‍यात आला.

सोलापूर विद्यापिठाच्‍या प्रभारी कुलगुरुपदी डॉ. आर्.के. कामत यांची निवड !    

पुण्‍यश्‍लोक अहिल्‍यादेवी होळकर सोलापूर विद्यापिठाच्‍या प्रभारी कुलगुरुपदी डॉ. आर्.के. कामत यांची राज्‍यपाल रमेश बैस यांनी निवड केली आहे. याविषयीचे पत्र कुलपती कार्यालयाकडून देण्‍यात आले आहे.

‘महर्षि कर्वे स्त्री शिक्षण संस्थे’मुळे महिलांचे सबलीकरण ! – दत्ताजी थोरात

महर्षि धोंडो केशव कर्वे यांच्या स्त्री शिक्षणाच्या कार्यामुळे अनेक अबला महिला सबला झाल्या आहेत. त्यामुळे त्या आज विविध क्षेत्रांत उत्तुंग भरारी घेत आहेत, असे प्रतिपादन ‘महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थे’चे शाळा समिती अध्यक्ष दत्ताजी थोरात यांनी व्यक्त केले.

विद्यार्थ्यांना मगध, चोला, चेरा, पांड्येन आणि हिंदवी स्वराज्य या साम्राज्यांविषयी शिकवा !

केंद्रशासनाने देशातील सर्वच हिंदु राष्ट्रपुरुषांचा प्रेरणादायी इतिहास राष्ट्रीय स्तरावर शिकवून विद्यार्थ्यांमध्ये शौर्यजागृती करावी !

परीक्षेत अनुत्तीर्ण झाल्यामुळे आंध्रप्रदेशात ९ विद्यार्थ्यांची आत्महत्या !

आत्महत्या करणार्‍यांत अल्प गुण मिळालेल्या विद्यार्थ्यांचाही समावेश

पिंपरी (पुणे) महापालिकेच्या प्राथमिक शाळांतील ‘ई क्लासरूम’ योजना बंदस्थितीत

महापालिकेच्या शाळांमध्ये संगणक, विज्ञान आणि गणित यांच्या वर्गखोल्या सिद्ध करण्यात आल्या. शिक्षकांना प्रशिक्षण देण्यात आले. प्रारंभीचे काही दिवस सोडल्यास अनेक तांत्रिक अडचणींमुळे ‘ई लर्निंग’ सध्या बंद पडल्याचे दिसून येत आहे.

चांदूर रेल्‍वे येथील मुंदडा महाविद्यालयावर प्रशासक नेमणार !

अशोक शिक्षण संस्‍थेद्वारा संचालित चांदूर रेल्‍वे येथील मदनगोपाल मुंदडा कला, वाणिज्‍य, विज्ञान महाविद्यालयावर प्रशासक नेमण्‍याच्‍या निर्णयावर विद्यापिठाने शिक्‍कामोर्तब केले आहे.