सेमी इंग्रजी माध्यम नको म्हणून सातारा येथे विद्यार्थिनीची आत्महत्या !

येथील नववीमध्ये शिकणार्‍या एका विद्यार्थिनीने सेमी इंग्रजी माध्यम नको; म्हणून रहात्या घरात गळफास लावून आत्महत्या केली आहे. आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीतून ही गोष्ट समोर आली आहे.

स्वामी विवेकानंद यांच्याविषयी अवमानकारक लिखाण प्रसारित केल्याप्रकरणी शिक्षण विभागाचे अधिकारी सनाउल्ला निलंबित !

हिंदु संतांविषयीचे अवमानकारक लिखाण रोखण्यासाठी सरकारने ईशनिंदा विरोधी कायदा करणे आवश्यक !

शिक्षक पात्रता परीक्षेत अपात्र ठरलेल्या ७ सहस्र ८८० विद्यार्थ्यांकडून प्रत्येकी १ लाख रुपये घेऊन करण्यात आले पात्र !

वर्ष २०१९-२० मधील शिक्षक पात्रता परीक्षेत अपात्र ठरलेल्या ७ सहस्र ८८० विद्यार्थ्यांकडून प्रत्येकी १ लाख रुपये घेऊन त्यांना पात्र ठरवण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार पोलीस अन्वेषणात उघड झाला आहे.

‘खरे शिक्षण कसे हवे ?’ याविषयी स्वामी विवेकानंद यांचे समाजाला उद्धृत करणारे बोल !

२५ जानेवारी २०२२ या दिवशी स्वामी विवेकानंद यांची तिथीनुसार जयंती आहे. त्यानिमित्ताने त्यांचे शिक्षणाविषयीचे काही अमूल्य विचार पुढे देत आहोत.

संभाजीनगर येथील ‘द जैन इंटरनॅशनल शाळे’चे नाव काळ्या सूचीत !

‘द जैन इंटरनॅशनल शाळे’च्या आवारात पुस्तके आणि लेखनसाहित्य यांची विक्री केल्याची तक्रार अमित कासलीवाल यांसह इतर ३ पालकांनी जिल्हा बाल हक्क परिषद अन् शिक्षण विभाग यांच्याकडे केली होती.

बनारस हिंदु विश्‍वविद्यालयामध्ये एम्.ए.साठी देशातील पहिल्या ‘हिंदु अभ्यासक्रमा’स  प्रारंभ !

स्वातंत्र्याच्या ७४ वर्षांनंतर हिंदुबहुल भारतात अशा प्रकारच्या अभ्यासक्रमास आणि तोही केवळ एका विश्‍वविद्यालयात प्रारंभ होणेे, हे आतापर्यंतच्या सर्वपक्षीय शासनकर्त्यांना लज्जास्पद !

शालेय अभ्यासक्रम आणि पाठ्यपुस्तके यांमध्ये आमूलाग्र पालट आवश्यक !

आज भारताच्या राजकीय पटलावर लोकांनी परिवर्तन घडवून आणले आहे, म्हणजेच देशात जे चुकीचे घडत होते, त्यात पालट करण्याचा जनादेश विद्यमान शासनकर्त्यांना दिला आहे. त्यामुळे त्यांच्याकडून अभ्यासक्रमाच्या दृष्टीनेही ठोस पावले उचलली जावीत, ही अपेक्षा !

मिरज शासकीय रुग्णालयात कोरोना आंतररुग्ण कक्षात कोरोनाबाधित विद्यार्थ्यांकडून दंगा, सामूहिक नृत्य !

जे विद्यार्थी भविष्यात जाऊन आधुनिक वैद्य होणार आहेत, त्यांच्याकडून अशा वर्तनाची अपेक्षा नाही ! अशा विद्यार्थ्यांना नोटिसा देऊन न थांबता त्यांना कठोर शिक्षाच होणे आवश्यक आहे.

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील इयत्ता ९ वी ते १२ वीपर्यंतच्या सर्व शाळा १५ फेब्रुवारीपर्यंत बंद

कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. त्या अनुषंगाने जिल्ह्यातील सर्व माध्यमांच्या सर्व शाळा १५ फेब्रुवारी २०२२ पर्यंत बंद ठेवण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत.

नागपूर ग्रामीण भागात शाळांतील ५५१ शिक्षकांची पदे रिक्त !

या शाळांमधील विद्यार्थ्यांना शिक्षण देण्यासाठी शिक्षण विभागाकडून शेजारील केंद्रातील शाळेतील शिक्षकांना प्रतिदिन पाठवण्यात येत आहे. अशा पद्धतीने या शाळांतील विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा कारभार चालू आहे, तसेच दिवसेंदिवस या जिल्हा परिषदांच्या शाळांची अवस्था अतिशय दयनीय अशी होत आहे.