मिरज शासकीय रुग्णालयात कोरोना आंतररुग्ण कक्षात कोरोनाबाधित विद्यार्थ्यांकडून दंगा, सामूहिक नृत्य !

शिस्तभंगाविषयी रुग्णालय प्रशासनाकडून विद्यार्थ्यांना नोटिसा

मिरज, ११ जानेवारी (वार्ता.) – मिरज शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात एकाच वेळी ९७ विद्यार्थी कोरोनाबाधित झाले आहेत. या विद्यार्थ्यांना जुनी ‘पॅथॉलॉजी’ आणि महिला वैद्यकशास्त्र कक्षात उपचारांसाठी भरती करण्यात आले आहे. इतक्या मोठ्या संख्येने विद्यार्थी बाधित झाल्याने या घटनेच्या चौकशीसाठी आलेल्या वैद्यकीय विभागाच्या सचिवांनी ‘सीसीटीव्ही’तून कक्षाची पहाणी केली असता त्यांना काही विद्यार्थी दंगामस्ती, चित्रपट गीतावर सामूहिक नृत्य आणि क्रिकेट खेळतांना आढळून आले. त्यामुळे वैद्यकीय शिक्षण घेणार्‍या या विद्यार्थ्यांना प्रशासनाने शिस्तभंगाची नोटीस बजावली आहे. (मेकॉलेप्रणीत शिक्षणपद्धतीतून कशा प्रकारचे विद्यार्थी सिद्ध होत आहेत, हे या उदाहरणातून लक्षात येते. वैद्यकीय महाविद्यालयामध्ये मुलांनी कसे वागायला हवे ? हेही शिकवायला हवे. जे विद्यार्थी भविष्यात जाऊन आधुनिक वैद्य होणार आहेत, त्यांच्याकडून अशा वर्तनाची अपेक्षा नाही ! अशा विद्यार्थ्यांना नोटिसा देऊन न थांबता त्यांना कठोर शिक्षाच होणे आवश्यक आहे. – संपादक)