बनारस हिंदु विश्‍वविद्यालयामध्ये एम्.ए.साठी देशातील पहिल्या ‘हिंदु अभ्यासक्रमा’स  प्रारंभ !

  • स्वातंत्र्याच्या ७४ वर्षांनंतर हिंदुबहुल भारतात अशा प्रकारच्या अभ्यासक्रमास आणि तोही केवळ एका विश्‍वविद्यालयात प्रारंभ होणेे, हे आतापर्यंतच्या सर्वपक्षीय शासनकर्त्यांना लज्जास्पद ! – संपादक
  • केंद्र सरकारने याकडे गांभीर्याने पहात देशातील प्रत्येक विश्‍वविद्यालयामध्ये, तसेच प्राथमिक शाळेपासून हिंदूंना धर्मविषयक शिक्षण देण्यासाठी तत्परतेने प्रयत्न करावेत, असेच हिंदूंना वाटते ! – संपादक

वाराणसी (उत्तरप्रदेश) – बनारस हिंदु विश्‍वविद्यालयात एम्.ए.साठी ‘हिंदु अभ्यासक्रम’ हा नवीन अभ्यासक्रम चालू करण्यात आला आहे. देशातील अशा प्रकारचा पहिला पदव्युत्तर अभ्यासक्रम आहे. बनारस हिंदु विश्‍वविद्यालयाचे कुलपती डॉ. विजय कुमार शुक्ला यांनी या अभ्यासक्रमाचे उद्घाटन केले. हा अभ्यासक्रम ‘राष्ट्रीय शिक्षा नीती, २०२०’नुसार सिद्ध करण्यात आला आहे. कला शाखेच्या अंतर्गत हा अभ्यासक्रम असणार आहे. दर्शनशास्त्र आणि धर्म विभाग, संस्कृत विभाग अन् प्राचीन भारतीय इतिहास, तसेच संस्कृती आणि पुरातत्व विभाग यांच्या सहयोगातून हा अभ्यासक्रम बनवण्यात आला आहे.

कुलपती डॉ. विजय कुमार शुक्ला यांनी सांगितले की, हा अभ्यासक्रम जगातील हिंदु धर्माच्या अज्ञात पैलूंची माहिती आणि शिक्षण देणारा आहे. याच्या पहिल्या तुकडीमध्ये ४५ विद्यार्थी सहभागी होऊ शकणार आहेत. यात काही विदेशी विद्यार्थीही आहेत. (उद्या हेच परदेशी विद्यार्थी भारतीय हिंदु विद्यार्थ्यांना हिंदु धर्माचे शिक्षण देऊ लागल्यास आश्‍चर्य वाटू नये ! – संपादक)