पुणे येथे मेट्रो स्थानकांना आस्थापनांची नावे देण्याच्या क्लृप्तीमुळे कोट्यवधींची कमाई !
मेट्रो स्थानकाच्या प्रवेशद्वारावर ही आस्थापने आणि संस्था यांची नावे दर्शनी भागामध्ये विज्ञापनांप्रमाणे देण्यात येतात.
मेट्रो स्थानकाच्या प्रवेशद्वारावर ही आस्थापने आणि संस्था यांची नावे दर्शनी भागामध्ये विज्ञापनांप्रमाणे देण्यात येतात.
वीजदेयक भरण्यासाठी ग्राहकांनी www.mahadiscom.in या संकेतस्थळाचे साहाय्य घ्यावे, असे आवाहन महावितरणकडून करण्यात आले आहे.
१९ मार्च या दिवशी केंद्रीय अन्वेषण विभागाने या प्रकरणी न्यायालयात खटला बंद करण्याविषयीचा अहवाल (क्लोजर रिपोर्ट) सादर केला आहे. एअर इंडियाने काही विमाने अल्प दरात खासगी वापरासाठी दिल्याचा आरोप आहे.
लोकशाही धोक्यात असल्याचा टाहो फोडणारी काँग्रेस लोकशाहीतील कायद्यांचे पालन करत नाही, असे सर्वसामान्य जनतेला वाटल्यास ते चुकीचे ठरणार नाही !
देहलीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना कह्यात घेतल्यानंतर न्यायालयात त्यांच्या जामीनअर्जाला विरोध करतांना ‘ईडी’ने देहली मद्य धोरण घोटाळ्यातील रक्कम आम आदमी पक्षाने वर्ष २०२२ मध्ये गोव्यातील विधानसभा निवडणुकीत वापरल्याचे म्हटले होते.
आपला पैसा, आपल्या देशात होणारे व्यवहार आणि त्यातील पैसा मात्र विदेशी आस्थापनांना अशी स्थिती आतापर्यंत होती. आता मात्र हे टाळता येणे शक्य आहे.
श्री तुळजाभवानी मंदिरातून चोरीला गेलेले देवीचे ऐतिहासिक दागिने, मौल्यवान वस्तू आणि ७१ पुरातन नाणी प्रकरणात अन्वेषण चालू आहे. सदरचे दागिने हे ८ व्या शतकातील आहेत.
ईडीने वीणा यांच्या समवेत त्यांच्या आस्थापनाच्या अन्य काही जणांच्या विरोधातही गुन्हा नोंदवला आहे.
राऊज एव्हेन्यू न्यायालयाने देहलीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या ईडी कोठडीत वाढ झाली आहे. १ एप्रिलपर्यंत त्यांना कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला आहे
उल्हास मोरजकर यांनी त्यांच्यावरील आरोप फेटाळले आहेत. संबंधित रक्कम पंचायतीच्या कामासाठीच वापरल्याचा त्यांनी दावा केला आहे; मात्र यासंबंधी ठोस पुरावे ते सादर करू शकले नाहीत.