अरविंद केजरीवाल यांच्या ईडी कोठडीत १ एप्रिलपर्यंत वाढ !

अरविंद केजरीवाल

नवी देहली – येथील राऊज एव्हेन्यू न्यायालयाने देहलीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या ईडी कोठडीत वाढ झाली आहे. १ एप्रिलपर्यंत त्यांना कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला आहे. त्यापूर्वी झालेल्या सुनावणीच्या वेळी केजरीवाल यांनी स्वतः स्वतःची बाजू मांडली. असे करणारे ते देशातील पहिले मुख्यमंत्री ठरले आहेत. ईडीने न्यायालयाकडे ७ दिवसांच्या कोठडी मागणी केली होती.

युक्तीवाद करतांना केजरीवाल म्हणाले, ‘‘या प्रकरणात माझे नाव केवळ ४ ठिकाणी आले आहे. ४ जबाब देण्यात असून त्यांपैकी मला गोवण्यात आलेले विधान न्यायालयासमोर मांडण्यात आले. मुख्यमंत्र्यांना अटक करण्यासाठी ही ४ विधाने पुरेशी आहेत का ? हे राजकीय षड्यंत्र आहे, याचे उत्तर जनता देईल.’’ यावर ईडीने उत्तर देतांना म्हटले, ‘‘मुख्यमंत्री कायद्याच्या वर नाहीत.’’