कोची (केरळ) – केरळचे मुख्यमंत्री पिनराई विजयन् यांची कन्या वीणा विजयन् यांच्या विरोधात अंमलबजावणी संचालनालयाने (‘ईडी’ने) आर्थिक गैरव्यवहाराचा गुन्हा नोंदवला आहे. ईडीचे म्हणणे आहे की, खासगी खनिज आस्थापन ‘कोचीन मिनरल्स अँड रुटाइल लिमिटेड’ने वीणा यांच्या ‘एक्झालॉजिक सोल्यूशन’ या आस्थापनाला बेकायदेशीरपणे १ कोटी ७२ लाख रुपये दिले आहेत. विशेष म्हणजे वीणा यांच्या आस्थापनाने या आस्थापनाला कोणत्याही प्रकारची सेवा दिली नाही.
ईडीने वीणा यांच्या समवेत त्यांच्या आस्थापनाच्या अन्य काही जणांच्या विरोधातही गुन्हा नोंदवला आहे. या प्रकरणाची आयकर विभागाकडूनही चौकशी चालू आहे.