मुंबई – एअर इंडिया आस्थापनाची विमाने भाडेतत्त्वार घेण्याच्या प्रकरणात वर्ष २०१७ पासून चालू असलेल्या आर्थिक अपहाराचे अन्वेषण बंद करण्याविषयी केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) सर्वाेच्च न्यायालयात अहवाल सादर केला आहे. या प्रकरणी केंद्रीय अन्वेषण विभागाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते प्रफुल्ल पटेल आणि अजित पवार यांच्यावर गुन्हा नोंदवला होता. सर्वाेच्च न्यायालयाच्या आदेशानुसार या प्रकरणी नागरी उड्डाण मंत्रालय आणि एअर इंडिया यांच्या अधिकार्यांवरही गुन्हा नोंदवण्यात आला होता.
१९ मार्च या दिवशी केंद्रीय अन्वेषण विभागाने या प्रकरणी न्यायालयात खटला बंद करण्याविषयीचा अहवाल (क्लोजर रिपोर्ट) सादर केला आहे. एअर इंडियाने काही विमाने अल्प दरात खासगी वापरासाठी दिल्याचा आरोप आहे.