‘अग्नीपथ’च्या विरोधात ‘भारत बंद’चे आवाहन : ५०० हून अधिक रेल्वे गाड्या रहित

सर्वोच्च न्यायालयाने बंदचे आवाहन करणार्‍यांकडून दंड वसूल करण्याचा आदेश दिलेला असतांनाही असे आंदोलन करणार्‍या संघटनांवर बंदीच घातली पाहिजे !

चीनने भारताशी केलेल्या करारांचे उल्लंघन केले ! – विदेशमंत्री

विदेशमंत्री एस्. जयशंकर यांनी चीनला सुनावत म्हटले की, भारत कोणत्याही परिस्थितीत वास्तविक नियंत्रणरेषेच्या सद्य:स्थितीमध्ये पालट करू देणार नाही.

काही देश वहात्या गंगेमध्ये हात धुऊन घेण्याचा प्रयत्न करत आहेत ! – विदेशमंत्री

नूपुर शर्मा यांनी महंमद पैंगबर यांच्यासंदर्भात केलेल्या कथित आक्षेपार्ह टिप्पणीवर अनेक इस्लामी देशांनी भारतावर टीका केली होती. यावर विदेशमंत्री एस्. जयशंकर यांनी वक्तव्य केले आहे. ते म्हणाले, ‘‘ती टिप्पणी भारत सरकार अथवा भाजप या दोघांची भूमिका नव्हती.

केंद्रीय सशस्त्र दल आणि आसाम रायफल्स यांमध्ये अग्नीवीरांसाठी १० टक्के आरक्षण

केंद्रीय सशस्त्र पोलीस दल आणि आसाम रायफल्स यांमध्ये भरतीसाठी अग्नीपथ योजनातील सैनिक ‘अग्नीवीर’ यांना १० टक्के आरक्षण देण्याचा निर्णय गृह मंत्रालयाने घेतला. या दलांमधील भरतीसाठी वयोमर्यादेत ३ वर्षांची सूट देण्यात आली होती.

भीम सेनेचे मुख्य सतपाल तंवर यांना अटक

महंमद पैगंबर यांचा कथित अवमान करणार्‍या भाजपच्या निलंबित प्रवक्त्या नूपुर शर्मा यांची जीभ छाटणार्‍याला १ कोटी रुपयांचे पारितोषिक देण्याची घोषणा केल्याच्या प्रकरणी भीम सेनेचे मुख्य सतपाल तंवर यांना पोलिसांनी त्यांच्या घरातून अटक केली.

केंद्र सरकारकडून अग्नीपथ योजनेच्या वयोमर्यादेत वाढ

केंद्र सरकारने या योजनेच्या अंतर्गत सैन्य भरतीसाठीची असलेली वयोमर्यादा २१ वर्षांवरून २३ वर्षे इतकी केली आहे. वयोमर्यादेत असलेली ही सवलत यंदाच्या पहिल्या भरतीसाठीच लागू असणार आहे.

कठोर लोकसंख्या कायदा करण्याची शक्यता पडताळून पहाण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात याचिका

नागरिकांचे मूलभूत अधिकार सुरक्षित ठेवण्यासाठी कठोर लोकसंख्या नियंत्रण कायदा करण्याची आवश्यकता आहे; कारण ते सर्व समस्यांचे मूळ आहे. त्यामुळे कायदा करण्याविषयी माहिती घ्यावी, अशी मागणी करणारी याचिका देवकीनंदन ठाकुर यांनी सर्वोच्च न्यायालयात केली आहे.

बुलडोझरची कारवाई कायद्यानुसार झाली पाहिजे ! – सर्वोच्च न्यायालय

उत्तरप्रदेशात योगी आदित्यनाथ सरकारच्या बुलडोझर कारवाईच्या विरोधातील याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली.

निदर्शने करणार्‍या मुसलमानांकडून पंतप्रधान मोदी यांना अश्‍लाघ्य शिवीगाळ केल्याचा व्हिडिओ लेखक तारेक फतेह यांच्याकडून प्रसारित  

कॅनडातील प्रसिद्ध इस्लामी विचारवंत आणि लेखत तारेक फतेह यांनी एक व्हिडिओ ट्वीट केला आहे. त्यात नूपुर शर्मा यांनी महंमद पैगंबर यांच्याविषयी केलेल्या कथित अवमानावरून मुसलमानांकडून निदर्शने केली जात असल्याचे दिसत आहे.

देहली उच्च न्यायालयाने भाजपच्या खासदारांविरुद्ध गुन्हा नोंदवण्याची माकपच्या वृंदा करात यांची याचिका फेटाळली

केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर आणि भाजपचे खासदार प्रवेश साहिब सिंह वर्मा यांनी वर्ष २०२० मध्ये केलेल्या कथित चिथावणीखोर विधानांच्या प्रकरणी माकपच्या हिंदुद्वेष्ट्या नेत्या वृंदा करात यांनी गुन्हा नोंवण्याची मागणी केली होती.