धार्मिक स्थळांवर लावण्यात आलेले भोंगे हटवण्यात यावेत !  

हिंदु महासभेचे सरन्यायाधिशांना पत्र

नवी देहली – धार्मिक स्थळांवर लावण्यात आलेले भोंगे हटवण्यात यावेत, अशी मागणी अखिल भारतीय हिंदु महासभेने सरन्यायाधीश एन्.व्ही. रमणा यांच्याकडे एका पत्राद्वारे केली आहे. ‘भोंग्यांवरून दिल्या जाणार्‍या अजानविषयी न्यायालयाने स्वःहून याचिका प्रविष्ट करून घ्यावी आणि अजानवर पूर्णपणे बंदी घालावी’, अशी मागणीही या पत्रात करण्यात आली आहे.

या पत्रात म्हटले आहे की,

१. मशीद, ईदगाह (सार्वजनिक प्रार्थनेसाठी स्थान) आणि दर्गा ही प्रार्थनास्थळे नाहीत, तर सार्वजनिक संमेलन आणि बैठका यांची ठिकाणे आहेत. त्यामुळेच ही स्थळे सामुदायिक बैठकीची ठिकाणे म्हणून घोषित केली जावीत.

२. इस्लाम धर्माची स्थापना झाली आणि कुराण रचले गेले तेव्हा ध्वनीक्षेपक नव्हते. त्यानंतर इस्लाम धर्माच्या प्रसारातही ध्वनीक्षेपक कुठेही नव्हता. याचा अर्थ ध्वनीक्षेपकाचा आणि इस्लामचा दुरान्वये संबंध नाही.

३. सर्वच धार्मिक स्थळांवर केवळ सणाच्या दिवशी ध्वनीक्षेपकाला अनुमती असावी. इतर दिवशी त्यास मनाई असावी.

संपादकीय भूमिका

अशी मागणी हिंदूंना पुनःपुन्हा करावी लागू नये. याविषयी सरकारनेच आता ठोस पावले उचलून कारवाई करणे आवश्यक !