रशिया-युक्रेन यांच्यातील युद्धात चर्चेच्या माध्यमातून उपाय काढण्याचा पंतप्रधान मोदी यांचा पुनरुच्चार

रशिया-युक्रेन युद्धासंदर्भात चर्चा आणि कूटनीती यांच्या माध्यमातून उपाय काढण्यासाठी प्रयत्न व्हायला हवे, असे पंतप्रधान मोदी म्हणाले.

(म्हणे) ‘आंतरराष्ट्रीय मानवाधिकार दायित्व पार पाडण्यात भारतीय अधिकारी अपयशी !’

काश्मीरमध्ये फोफावलेल्या जिहादी आतंकवादाचे समर्थन करणार्‍या ‘अ‍ॅम्नेस्टी इंटरनॅशनल’ या बंदी घातलेल्या भारतद्वेषी संघटनेला हिंदूंचा कथित पुळका

सोनिया गांधी यांच्या स्वीय साहाय्यकाविरुद्ध बलात्काराचा गुन्हा नोंद

माधवन् यांनी विवाह आणि नोकरी देण्याचे आमीष दाखवून बलात्कार केल्याचा आरोप या महिलेकडून करण्यात आला आहे. माधवन् यांच्याकडून ठार मारण्याची धमकी येत असल्याने तिने संरक्षण देण्याचीही मागणी केली आहे.

ट्विटरकडून खलिस्तान समर्थकांच्या खात्यांवर भारतात बंदी !

केंद्र सरकारने ट्विटरकडे मागणी केल्यानंतर ट्विटरकडून खलिस्तानी आतंकवादी, पाकची गुप्तचर संघटना पाकच्या आय.एस्.आय.शी संबंधित खाती आणि आतंकवाद्यांची खाती यांवर भारतात बंदी घालण्यात आली आहे.

पत्रकार राणा अयुब यांचे ट्विटर खात्यावर बंदी

काशी येथील ज्ञानवापीच्या सर्वेक्षणाच्या विरोधात केलेल्या ट्वीटमुळे ट्विटरने पत्रकार राणा अयुब यांच्या ट्विटर खात्यावर बंदी घातली आहे. भारत सरकारने राणा अयुब यांच्या खात्यावर कारवाई करण्याची मागणी ट्विटरकडे केली होती.

देशात गेल्या २४ घंट्यांत कोरोनाचे ११ सहस्र ५७८ नवे रुग्ण

देशात गेल्या २४ घंट्यांत कोरोनाचे ११ सहस्र ५७८ नवे रुग्ण आढळले आहेत, तर २५ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. गेल्या ५ दिवसांत ७० सहस्र २६५ नवीन रुग्ण आढळले आहेत.

वर्ष २००२ मधील गुजरात दंगल हे पंतप्रधान मोदी यांच्या विरोधातील षड्यंत्र ! – गृहमंत्री अमित शहा

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची प्रतिमा डागाळण्यासाठीच संपूर्ण षड्यंत्र रचण्यात आले होते; परंतु शेवटी सत्य समोर आले. दंगलींचा राजकीय उपयोग करणे अयोग्य आहे.

नौदलाचे आजी-माजी सैनिक आता मर्चंट नेव्हीमध्ये काम करू शकतात !

असा करार भारतीय नौदल आणि नौवहन संचालनालय यांच्यात झाला आहे.

भारतीय फूटबॉल महासंघाने खेळाडूंना प्रेरित करण्यासाठी घेतले ज्योतिष आस्थापनाचे साहाय्य !

प्रारब्ध, देवाण-घेवाण आदी सूक्ष्मातील गोष्टींचा मानवी जीवनावर होत असलेला परिणाम बुद्धीने जाणून घेण्याचे उत्कृष्ट माध्यम म्हणजे ज्योतिषशास्त्र ! हिंदूंमधील धर्मशिक्षणाच्या अभावामुळे अशा घटनांना विरोध केला जातो !

पैगंबरावरील विधानामुळे भारताच्या प्रतिमेला हानी पोचली ! – राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल

पाकिस्तान, बांगलादेश, तसेच आखातातील इस्लामी देश अल्पसंख्यांकांचा छळ करतात, तसेच हिंदूंचा वंशसंहार करतात, तरी ते त्यांच्या प्रतिमेचा कधी विचार करत नाहीत आणि भारतही त्यांना यावरून जाब विचारत नाही, याविषयी कोण बोलणार ?