gurupournima

सनातन संस्थेकडून देहली आणि पंजाब येथे श्रीरामनवमीनिमित्त विविध उपक्रमांचे आयोजन

रामनवमीच्या पावन दिनी देहलीच्या सनातनच्या सौ. प्रोमिला अगरवाल यांच्या निवासस्थानी आणि ९ एप्रिल या दिवशी श्रीरामनामसंकीर्तनाचे आयोजन करण्यात आले.

ज्यांना ‘द कश्मीर फाइल्स’ भूतकाळ वाटतो, त्यांनी देहलीतील दंगल पहावी !

ज्यांना ‘द कश्मीर फाइल्स’ हा चित्रपट केवळ काश्मीरचा भूतकाळ होता’, असे वाटत असेल, तर ती त्यांची चूक आहे. ‘तो भारतात भविष्यात काय घडणार आहे?’, हे सांगणारा ‘संक्षिप्त भाग’ (ट्रेलर) आहे. भारतात हनुमान जयंतीच्या मिरवणुकांवर झालेली आक्रमणे, हा त्याचा पुरावा आहे.

हिंदु राष्ट्राची स्थापना विश्वाच्या कल्याणासाठी ! – सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे, राष्ट्रीय मार्गदर्शक, हिंदु जनजागृती समिती

देहलीमधील जसोला येथे हिंदु राष्ट्र-जागृती सभेचे आयोजन

देहली येथील विकासपुरीमध्ये हिंदु संघटनांकडून शोभायात्रा

तलवार आणि लाठ्या काठ्या घेऊन हिंदूंचा सहभाग
जहांगीरपुरीसारखे आक्रमण झाल्यास बचावासाठी तलवारी बाळगल्याचा हिंदूंचा दावा

केंद्र सरकार ‘पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया’वर बंदी घालण्याच्या सिद्धतेत !

एका आतंकवादी संघटनेवर बंदी घातली की, ती तेच आतंकवादी दुसर्‍या नावाने संघटना चालू करून आतंकवादी कृत्ये करत रहातात ! यासाठी सरकारने आतंकवादी संघटनांसह आतंकवाद्यांचाही नायनाट करणे आवश्यक आहे !

अधिवक्त्यांच्या पेहरावाच्या सूत्रावर चर्चा करण्यासाठी ‘बार कौंसिल ऑफ इंडिया’कडून ५ सदस्यीय समितीची स्थापना !

स्वातंत्र्याच्या ७४ वर्षांनंतरही ब्रिटीशकालीन नियमांचे अंधपणे पालन करणारे ‘बार कौंसिल ऑफ इंडिया’ !

पेट्रोल आणि डिझेल यांची वाढ पैशात कशाला ? पैशातील हिशोबाला ती सर्वांनाच अडचण ठरत असल्याने ती रुपयांत का करत नाही ?

‘पेट्रोल आणि डिझेल यांच्या दरात ८० पैशांची वाढ झाली आहे. गेल्या १५ दिवसांत ही तेरावी वाढ आहे. यामुळे देहलीत पेट्रोल प्रतिलिटर १०४.६१ रुपये झाले, तर डिझेलचा दर प्रतिलिटर ९५.८७ रुपये झाला आहे. मुंबईत हेच दर अनुक्रमे ११९.६७ रुपये आणि १०३.२८ रुपये झाले आहेत.’

जे.एन्.यू.मध्ये श्रीरामनवमीची पूजेवरून अभाविप आणि साम्यवादी विद्यार्थी यांच्यात हाणामारी !

जे.एन्.यू.’मध्ये राष्ट्रघातकी आणि हिंदुद्वेषी विचारसरणीचे विद्यार्थी, शिक्षक यांची संख्या अधिक ! काँग्रेसच्या राज्यात यांना प्रोत्साहन मिळत होते. आता भाजपच्या राज्यात त्यांना प्रखर विरोध होत आहे. त्यातूनच गेल्या काही वर्षांत संघर्षाच्या घटना घडत आहेत !

कोरोनाचे रुग्ण वाढू लागल्याने केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचा ५ राज्यांना सतर्क रहाण्याचा सल्ला !

देशातील काही राज्यांत पुन्हा एकदा कोरोनाचे रुग्ण वाढू लागल्यानंतर केंद्रीय आरोग्य सचिवानी देहली, हरियाणा, मिझोराम, महाराष्ट्र आणि केरळ सरकारांना पत्र लिहून सतर्कता वाढवण्यास सांगितले आहे.

विवाह करण्याचे वचन देऊन संमतीने ठेवलेले शारीरिक संबंध हा बलात्कार नाही ! – देहली उच्च न्यायालय

विवाहाचे वचन देऊन संमतीने शारीरिक संबंध ठेवले आणि काही कारणाने विवाह झाला नाही, तर तो बलात्कार होत नाही, असा निर्णय देहली उच्च न्यायालयाने एका खटल्याच्या वेळी दिला आहे.