कोल्हापूर – तिरुपती देवस्थानकडून श्री महालक्ष्मीदेवीसाठी सोनेरी रंगाचे आणि गडद वीटकरी, लाल रंगाचे काठ असणारे १ लाख २८ सहस्र ७०० रुपयांचे महावस्त्र अर्पण करण्यात आले. हे महावस्त्र बी. शशीधर यांनी सपत्नीक येऊन पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीचे प्रशासक तथा जिल्हाधिकारी कोल्हापूर यांच्याकडे सुपुर्द केले. या वेळी देवस्थान समितीचे सचिव शिवराज नाईकवाडे, व्यवस्थापक महादेव दिंडे, तसेच अन्य देवस्थान समिती कर्मचारी उपस्थित होते.