हिंदूंवर आक्रमण करणाऱ्या टोळीविरोधात लढण्यासाठी त्यांची ‘इकोसिस्टम’ समजून घेणे आवश्यक ! – सुरेश चव्हाणके, सुदर्शन न्यूज

हिंदु जनजागृती समितीच्या वतीने ‘वाढत्या दंगली कि नियोजनबद्ध जिहादी आक्रमणे ?’ या विषयावर ‘ऑनलाईन’ विशेष संवाद !

इकोसिस्टम म्हणजे धर्मांधांनी विरोधकांना शह देण्यासाठी विविध स्तरांवर राबवलेली कार्यप्रणाली !

श्री. सुरेश चव्हाणके

मुंबई – भारताची मुख्य सुरक्षायंत्रणा असलेल्या राजधानी देहलीतील जहांगीरपुरी येथे दंगल होते, हे लज्जास्पद आहे. हे सर्व अचानक झाले नसून सर्व पूर्वनियोजित होते, असे आता समोर येत आहे; मात्र अशा दंगली काही नवीन नसून नेहमीच विविध दंगलीत हिंदूंवर दगडफेक आणि आक्रमण करणारे धर्मांध असतात. हे जगभर चालू आहे. या आक्रमणकर्त्यांच्या बचावासाठी पुढे येणारे अधिवक्ता, तथाकथित मानवाधिकारवाले, इस्लामी संघटना आणि हिंदूंची मानहानी करणारी प्रसारमाध्यमे या टोळीची ‘इकोसिस्टम’ हिंदूंनी समजून घेणे आवश्यक आहे, तरच या टोळीच्या विरोधात लढता येईल. या टोळीचा पराभव करण्यासाठी हिंदूंनी स्वत:ची यंत्रणा उभारणे आवश्यक आहे. देशभरात अनेक राज्यांत हिंदूंची मंदिरे, मठ तोडल्यावर त्यावर न्याय द्यायला न्याययंत्रणेला वेळ नसून अतिक्रमण केलेल्या धर्मांधांच्या विरोधातील कारवाईवर स्थगिती आणण्यासाठी न्यायालय अन् येथील संपूर्ण यंत्रणा तत्परता दाखवते, हे लक्षात ठेवले पाहिजे, असे प्रतिपादन ‘सुदर्शन न्यूज’ वृत्तवाहिनीचे मुख्य संपादक श्री. सुरेश चव्हाणके यांनी केले. हिंदु जनजागृती समिती आयोजित ‘वाढत्या दंगली कि नियोजनबद्ध जिहादी आक्रमणे ?’, या विषयावरील ‘ऑनलाईन’ विशेष संवादात ते बोलत होते.


पुन्हा दंगली होणार नाहीत, अशी कारवाई पोलीस आणि सरकारी यंत्रणा यांच्याकडून झाली पाहिजे ! – अधिवक्ता युधवीरसिंह चौहान, देहली उच्च न्यायालय

अधिवक्ता युधवीर सिंह चौहान

देहली येथे नुकतीच झालेली दंगल हे आपल्या यंत्रणेचे मोठे अपयश आहे. पुढे अशा प्रकारच्या दंगली किंवा आक्रमणे होणार नाहीत, अशा प्रकारचे अन्वेषण आणि कारवाई पोलीस अन् सरकारी यंत्रणांकडून झाली पाहिजे. दंगली घडवणारे जे अवैधरित्या या देशात रहात आहेत, त्यांची ठिकाणे, तसेच त्यांचे आर्थिक स्रोत काय आहेत, याच्या मुळापर्यंत सरकारने पोचणे आवश्यक आहे.


‘जमियत उलेमा ए हिंद’सारख्या संघटनेवर केंद्र सरकारने बंदी घालावी ! – नरेंद्र सुर्वे, प्रवक्ते, हिंदु जनजागृती समिती

श्री. नरेंद्र सुर्वे

हिंदूंच्या मिरवणुकांवर आक्रमणे करणारे बांगलादेशी आणि रोहिंग्या घुसखोरांना देशाबाहेर हाकलून देणे आवश्यक आहे. देहलीतील दंगेखोरांच्या बचावासाठी पुढे आलेली ‘जमियत उलेमा ए हिंद’सारख्या धर्मांध संघटनेवर केंद्र सरकारने बंदी घालावी. या संघटना ‘हलाल प्रमाणपत्रा’च्या माध्यमातून पैसा गोळा करत आहेत. केवळ हिंदूंचे सण नव्हे, तर ‘ईस्टर’ सणाच्या दिवशीही स्पेन आणि स्वीडन येथे ख्रिस्ती बांधवांनी काढलेल्या मिरवणुकांवरही धर्मांधांनी दगडफेक करून आक्रमणे केली. केवळ भारतच नव्हे, तर जगभरात जिथे जिथे धर्मांधांची संख्या वाढत आहे, तिथे अशी आक्रमणे चालूच आहेत. आपल्या पूर्वजांनी परकियांची अनेक आक्रमणे थोपवून त्याविरोधात लढा दिला, तसा लढा आता आपल्याला द्यावा लागणार आहे.