
नवी देहली – राजधानी देहलीतील मयूर विहार परिसरात भाजपचे जिल्हा मंत्री जीतू चौधरी यांची गुंडांनी गोळ्या झाडून हत्या केली. जीतू चौधरी हे मयूर विहारमधील त्यांच्या घरातून बाहेर येताच गुंडांनी त्यांच्यावर गोळ्या झाडल्या. गोळ्या झाडल्यानंतर गुंडांनी घटनास्थळावरून पळ काढला.
दिल्ली में बाइकसवार अज्ञात बदमाशों ने एक स्थानीय भाजपा नेता की उन्ही के घर के सामने गोली मारकर हत्या कर दी।
जानकारी के अनुसार, मृतक की पहचान मयूर विहार फेज-3 निवासी, 42 वर्षीय जितेंद्र उर्फ जीतू चौधरी के रूप में हुई है। #BJP pic.twitter.com/KbWMgXecnW
— Ritam | ऋतम् (@TheRitamApp) April 21, 2022
कुटुंबियांनी जीतू चौधरी यांना गंभीर अवस्थेत नोयडा येथील मेट्रो रुग्णालयात भरती केले; मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. त्यांना ४-५ गोळ्या लागल्याचे सांगण्यात येत आहे. भरदिवसा भाजप नेत्यावर गोळ्या झाडल्यानंतर संपूर्ण परिसरात भीतीचे वातावरण आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोचले. या हत्या प्रकरणी पोलिसांकडून कुठलीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही.
संपादकीय भूमिकाराजधानी देहलीतून देशाचा कारभार हाकला जात असतांना त्याच शहरात सत्ताधारी पक्षाच्या नेत्याची दिवसाढवळ्या हत्या होते, हे सरकारी यंत्रणेला लज्जास्पद ! |
सोनम वांगचुक यांनी उपोषण संपवले !
शिक्षण सचिवांचे स्थानांतर : नवा कायदाही करणार !
‘नीट’ परीक्षेच्या ढिसाळ कारभाराच्या विरोधात मुंबई उच्च न्यायालयात याचिका !
भारताचे तुकडे होण्याच्या घोषणा देणारे देशद्रोहीच ! – मनोज मुंतशीर, संगीतकार
फाशी दिली जाऊ शकते, हे ठाऊक असतांनाही मी बांगलादेशात परत जाणार !
काँग्रेस नेत्यांनी कर्नाटकातील मंदिरांच्या १८ लाख रुपयांची केली लूट ! : भाजप