सर्वोच्च न्यायालयाचे अधिवक्ता विनीत जिंदल यांचा शिरच्छेद करण्याची धमकी !

हिंदुत्वनिष्ठांना धमकी मिळाल्यावर पोलीस संबंधितांना संरक्षण पुरवतात. असे संरक्षण पुरवण्यासह धमकी देणार्‍यांवर वचक बसेल, अशी कारवाई केल्यास हिंदूंना धमकावण्याचेच काय, तर त्यांच्याकडे डोळे वर करून बघण्याचे धर्मांधांचे धाडस होणार नाही !

सोनिया गांधी यांची ‘ईडी’कडून दुसर्‍यांदा चौकशी

कायद्यानुसार चालू असलेल्या चौकशीला असा विरोध करणारी काँग्रेस कायदाद्रोही आणि जनताद्रोहीच होत ! ‘या प्रकणी दोषींची चौकशी होऊन सत्य जनतेसमोर येऊ दे’,  असे काँग्रेसवाले कधी म्हणत नाहीत, हे लक्षात घ्या !

मी राष्ट्रपती होणे, हे माझे वैयक्तिक यश नसून हे भारतातील प्रत्येक गरिबाचे यश आहे ! – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

द्रौपदी मुर्मू यांनी २५ जुलै या दिवशी राष्ट्रपतीपदाची शपथ घेतली. संसदेतील ‘सेंट्रल हॉल’मध्ये पार पडलेल्या या शपथविधीला मावळते राष्ट्रपती रामनाथ कोविंद, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह अनेक मोठे नेते उपस्थित होते.

शहजाद अंसारी याने ‘रवींद्र’ बनून हिंदु महिलेशी ७ वर्षांपूर्वी केला विवाह !

हिंदूंच्या मुळाशी उठलेल्या लव्ह जिहादच्या विरोधात केवळ काही भाजपशासित  राज्यांमध्येच कायदा आहे. आता अशा घटनांमधून हा कायदा राष्ट्रव्यापी होण्याची किती आवश्यकता आहे, हे लक्षात येते !

द्रौपदी मुर्मू भारताच्या १५ व्या राष्ट्रपती !

भाजपप्रणीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या राष्ट्रपतीपदाच्या उमेदवार ६४ वर्षीय द्रौपदी मुर्मू देशाच्या पहिल्या आदिवासी महिला राष्ट्रपती बनल्या आहेत.

वेदनेने विव्हळत असलेल्या गर्भवती महिलेला नवी देहलीतील सफदरजंग रुग्णालयाकडून भरती करून घेण्यास नकार !

माणुसकीहीन वर्तणूक करणारे संबंधित आधुनिक वैद्य आणि अधिकारी यांच्यावर कठोर कारवाईच व्हायला हवी !

ज्ञानवापीमधील शिवलिंगाची पूजा करण्याच्या मागणीवरील याचिकेवर सध्या सुनावणी करण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार !

ज्ञानवापी परिसरात सापडलेल्या शिवलिंगाची पूजा करण्याची अनुमती मागणारी आणि त्याची ‘कार्बन डेटिंग’ चाचणी करण्याची मागणी करणार्‍या नवीन याचिकेवर सध्या सुनावणी करण्यास सर्वोच्च न्यायालयाने नकार दिला.

कोणताही उदारमतवादी देश भारताएवढा उदार बनू शकत नाही ! – तस्लिमा नसरीन, बांगलादेशी लेखिका

भारताला असहिष्णु, धर्मांध, पुराणमतवादी म्हणत त्यास हिणवणार्‍यांना आता काय म्हणायचे आहे ?

देहलीतील मुसलमानबहुल सीलमपूर येथे अज्ञातांनी कावड यात्रेवर टाकले मांस !

‘हिंदूंच्या धार्मिक मिरवणुका आणि धार्मिक यात्रा यांवर मुसलमानबहुल भागांतून आक्रमणे का होतात ?’, हे एकही निधर्मीवादी किंवा पुरो(अधो)गामी कधीही सांगत नाही. उलट ‘देशात मुसलमान असुरक्षित आहेत’, अशी बांग मात्र नेहमीच दिली जाते !

प्रत्येक वर्षी दीड लाख भारतीय सोडतात नागरिकत्व !

केंद्रीय गृहराज्यमंत्री नित्यानंद राय यांनी संसदेत दिलेल्या आकडेवारीनुसार प्रतिवर्षी सरासरी दीड लाख नागरिक भारताचे नागरिकत्व सोडत आहेत. त्यांची पहिली पसंती अमेरिकेला आहे.