कोणताही उदारमतवादी देश भारताएवढा उदार बनू शकत नाही ! – तस्लिमा नसरीन, बांगलादेशी लेखिका

तस्लिमा नसरीन

नवी देहली – मी भारतावर प्रेम करते; कारण येथे एक मुसलमान, शीख, दलित, महिला, निरीश्‍वरवादी किंवा एक आदिवासीही देशाचा राष्ट्रपती अथवा सरकारचा प्रमुख बनू शकतो. कोणतेही सभ्य अथवा उदारमतवादी देश भारताएवढा उदार बनू शकत नाहीत, असे ट्वीट मूळच्या बांगलादेशातील आणि सध्या भारताचा आश्रय घेतलेल्या प्रसिद्ध लेखिका तस्लिमा नसरीन यांनी केले.

संपादकीय भूमिका

भारताला असहिष्णु, धर्मांध, पुराणमतवादी म्हणत त्यास हिणवणार्‍यांना आता काय म्हणायचे आहे ?