प्रत्येक वर्षी दीड लाख भारतीय सोडतात नागरिकत्व !

सर्वाधिक लोकांची पहिली पसंती अमेरिका !

नवी देहली – केंद्रीय गृहराज्यमंत्री नित्यानंद राय यांनी संसदेत दिलेल्या आकडेवारीनुसार प्रतिवर्षी सरासरी दीड लाख नागरिक भारताचे नागरिकत्व सोडत आहेत. त्यांची पहिली पसंती अमेरिकेला आहे.

१. राय यांनी पुढे माहिती देतांना सांगितले की, वर्ष २०२१ मध्ये १ लाख ६३ सहस्र ३७० लोक भारतीय नागरिकत्व सोडून परदेशात स्थायिक झाले आहेत. यामध्ये सर्वाधिक ७८ सहस्र २८४ नागरिकांनी भारतीय नागरिकत्व सोडत अमेरिकेचे नागरिकत्व स्वीकारले आहे. वर्ष २०१९ मध्ये ६१ सहस्र ६८३ नागरिकांनी भारतीय नागरिकत्व सोडून अमेरिकेचे नागरिकत्व स्वीकारले होते.

२. वर्ष २०१९ मध्ये एकाही भारतीय नागरिकाने पाकिस्तानचे नागरिकत्व स्वीकारले नव्हते. वर्ष २०२० मध्ये ७, तर वर्ष २०२१ मध्ये ४१ जणांनी पाकचे नागरिकत्व स्वीकारले. वर्ष २०२१ मध्ये एका व्यक्तीने बांगलादेशचे नागरिकत्व स्वीकारले आहे.