
नवी देहली – भाजपप्रणीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या राष्ट्रपतीपदाच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू विजयी झाल्या असून त्या भारताच्या १५ व्या राष्ट्रपती बनल्या आहेत. त्यांच्या विरोधात निवडणूक लढणारे काँग्रेसप्रणीत संयुक्त पुरोगामी आघाडीचे उमेदवार यशवंत सिन्हा यांचा दारूण पराभव झाला आहे. ६४ वर्षीय मुर्मू या देशाच्या पहिल्या आदिवासी महिला राष्ट्रपती बनल्या आहेत. या निवडणुकीत मतदानाच्या वेळी तृणमूल काँग्रेसचे मतदार अनपेक्षितपणे अनुपस्थित राहिले.
Delhi | Prime Minister Narendra Modi greets and congratulates #DroupadiMurmu on being elected as the new President of the country. BJP national president JP Nadda is also present.
Visuals from her residence. pic.twitter.com/5wrcpCXElC
— ANI (@ANI) July 21, 2022
या निवडणुकीसाठी १८ जुलैला मतदान झाले होते. मुर्मू या २५ जुलै या दिवशी राष्ट्रपतीपदाची शपथ घेतील. ‘मुर्मू यांचा कार्यकाळ अत्यंत यशस्वी ठरेल’, असा विश्वास भाजपचे पक्षाध्यक्ष जे.पी. नड्डा यांनी व्यक्त केला. मुर्मू या मे २०१५ ते जुलै २०२१ या कालावधीसाठी झारखंडच्या राज्यपाल राहिल्या होत्या. त्या मूळच्या ओडिशा राज्यातील मयूरभंज जिल्ह्यातील आहेत. त्यांच्या विजयानंतर भाजपच्या कार्यकर्त्यांनी देशभर आनंदोत्सव साजरा केला.
(म्हणे) ‘भाजपने पसरवलेल्या विषामुळे देशातील बहुसंख्य समाज विषारी झाला आहे !’ – Samajwadi Party MP Javed Ali
Bhagwant Mann : ‘अकाल तख्त’ने पंजाबचे मुख्यमंत्री मान यांना ठरवले ‘गुरु द्रोही’ !
देशातील महत्त्वाच्या ठिकाणांवर ड्रोनद्वारे आक्रमणाची शक्यता : सरकारकडून अतीदक्षतेची चेतावणी
हिंदु धर्माचीही नोंदणी झालेली नाही ! – RSS Chief Mohan Bhagwat
Telegram Blocked : ‘नीट’ परीक्षेच्या पार्श्वभूमीवर भारतात टेलिग्रामवर बंदी
आतंकवादी कसाबने कारागृहात मटण बिर्याणी मागितल्याचे वृत्त जाणीवपूर्वक पेरले होते ! – ज्येष्ठ विधीज्ञ पद्मश्री उज्ज्वल निकम