रस्त्यावरच द्यावा लागला बाळाला जन्म !

नवी देहली – वेदनेने विव्हळत असलेल्या एका गर्भवती महिलेला येथील प्रसिद्ध सफदरजंग रुग्णालयाने भरती करून घेण्यास नकार दिल्याने रस्त्यावरच या महिलेची प्रसूती करावी लागली. उत्तरप्रदेशच्या दादरी येथून एक ३० वर्षीय माहिला सफदरजंग रुग्णालयात आली होती. महिलेला रात्रीपासून प्रसूतीकळा चालू झाल्या होत्या. तिला तातडीने रुग्णालयात नेण्यात आले. या संपूर्ण घटनेचा एक व्हिडिओ सामाजिक माध्यमांवर मोठ्या प्रमाणात प्रसारित होत असून रुग्णालय प्रशासनावर टीका केली जात आहे.
सौजन्य :News24
या घटनेवरून केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने सफदरजंग रुग्णालयाकडून अहवाल मागितला आहे, तर देहली महिला आयोगानेही रुग्णालय प्रशासनाला नोटीस पाठवून उत्तर देण्याचा आदेश दिला आहे.
संपादकीय भूमिकामाणुसकीहीन वर्तणूक करणारे संबंधित आधुनिक वैद्य आणि अधिकारी यांच्यावर कठोर कारवाईच व्हायला हवी ! |
मडिकेरी (कर्नाटक) येथे मंदिराच्या परिसरात कबर : हिंदूंकडून निषेध
देहली आंदोलनावरून संसदेचे कामकाज स्थगित
देहलीतील आंदोलनात ९८९ गुन्हेगारांचा समावेश ! – Delhi Police
जेन-झी यांना काही लोक प्रामाणिक वाटले, तर ते लगेच प्रभावित होतात !
विरोधकांच्या गदारोळामुळे संसदेत परीक्षा सुधारणा विधेयकावर चर्चा झाली नाही !
वर्ष २०३० पर्यंत विदेशी रुग्णांसाठी भारत होणार दीड लाख कोटी रुपयांची बाजारपेठ !