ग्रंथमालिका : देवतांची उपासना आणि तिच्यामागील शास्त्र

देवतेची वैशिष्ट्ये आणि कार्ये कळल्याने देवतेचे माहात्म्य उमगते. देवतेच्या उपासनेमागील शास्त्र कळल्याने देवतेच्या उपासनेविषयी श्रद्धा अधिक वाढते.

श्री दत्ताची शस्त्रे !

सर्व प्रकृतीविकारांना धुऊन टाकतो, नष्ट करतो, तो अवधूत होय), अशी त्याची ‘सिद्धसिद्धान्तपद्धती’नुसार (६.१) व्याख्या आहे. सर्व प्रकृतीविकार म्हणजे सत्त्व, रज आणि तम हे त्रिगुण. दत्त त्यांना धुऊन टाकतो, म्हणजेच निर्गुणाची अनुभूती देतो.

श्री दत्तगुरूंची तीर्थक्षेत्रे !

‘दत्त संप्रदायाची काशी’ म्हणून गाणगापूर तीर्थाचे महत्त्व आहे ! श्री नृसिंहसरस्वतींनी त्यांच्या ८० वर्षांच्या कालखंडात १२ वर्षे क्षेत्र नरसोबाची वाडी येथे वास्तव्य केले, तर अत्यंत प्रिय अशा कृष्णा नदीस सोडून नृसिंहसरस्वती भीमा-अमरजा संगमावरील गाणगापूर या क्षेत्रावर २० वर्षे राहिले !

श्री दत्तात्रेयांची गुणवैशिष्ट्ये !

भगवान दत्तात्रेय सद्गुरुपदावर विराजमान असले, तरी ते वृत्तीने सतत ‘शिष्य’ अवस्थेत वावरतात. ‘शिष्य म्हणजे अखंड शिकत रहाणे.’ शिष्याचे मूर्तीमंत उदाहरण म्हणजे भगवान दत्तात्रेय होय.

ठाणेकरांचे श्रद्धास्थान – श्री विठ्ठल सायन्ना दत्त मंदिर !

ठाणे हे जसे तलावांप्रमाणे मंदिरांचे शहरही आहे. ठाण्यात जी काही प्रसिद्ध आणि जुनी मंदिरे आहेत, त्यांपैकी एक म्हणजे दमाणी इस्टेट या भागातील श्री विठ्ठल सायन्ना दत्त मंदिर आहे.

सानपाडा (वाशी) येथे दत्तजयंती उत्सवाचे आयोजन !

ठाणे-बेलापूर पट्टीतील सर्वांत पुरातन म्हणून ओळखल्या जाणार्‍या सानपाडा येथील श्री दत्त मंदिरात भव्य दत्तजयंती उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.

साधकांनो, दत्तजयंतीच्या निमित्ताने लावण्यात येणार्‍या ग्रंथप्रदर्शनातून सनातनने प्रकाशित केलेली ग्रंथसंपदा सर्वदूर पोचवा !

२६.१२.२०२३ या दिवशी दत्तजयंती आहे. त्या निमित्ताने सनातनने प्रकाशित केलेले ग्रंथ, लघुग्रंथ आणि सात्त्विक उत्पादने अधिकाधिक जिज्ञासूंपर्यंत पोचवण्याची सुवर्णसंधी लाभली आहे.

दत्ताच्या तारक आणि मारक नामजपांचा तीव्र आध्यात्मिक त्रास असलेल्या साधकांवर झालेला परिणाम

दत्ताचा मारक नामजप ऐकल्यानंतर तीव्र आध्यात्मिक त्रास असलेल्या दोन्ही साधकांतील नकारात्मक ऊर्जा पुष्कळ न्यून किंवा नाहीशी होऊन त्यांच्यातील सकारात्मक ऊर्जेत वाढ होणे

विवाह न जुळण्यातील अडथळे आणि उपाययोजना !

हल्लीच्या काळी पूर्वीप्रमाणे कुणी कुटुंबातील मृत व्यक्तीचे श्राद्ध-पक्ष करत नाही, तसेच साधनाही करत नसल्याने बहुतेक सर्वांनाच पूर्वजांच्या लिंगदेहांमुळे त्रास होतो.