हिंदु राष्ट्र स्थापनेसाठी बेंगळुरू (कर्नाटक) येथे श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांच्या हस्ते पार पडली ‘श्री सत्यदत्त पूजा’ !

‘श्री सत्यदत्त पूजा’ करताना श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ आणि समवेत पुरोहित श्री. सिद्धेश करंदीकर 

बेंगळुरू (कर्नाटक) – श्रावण पौर्णिमा आणि हयग्रीव जयंतीच्या शुभ मुहूर्तावर, म्हणजेच १९ ऑगस्ट २०२४ या दिवशी सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या एक आध्यात्मिक उत्तराधिकारी श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांनी बेंगळुरू येथील साधक श्री. जनार्दन गाडी आणि सौ. पद्मा जनार्दन यांच्या घरी ‘श्री सत्यदत्त पूजा’ केली. या वेळी त्यांनी ‘हिंदु राष्ट्राची स्थापना व्हावी, सर्वत्रच्या साधकांना होणारे शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक त्रास दूर व्हावेत’, यांसाठी भगवान दत्तात्रेयांच्या चरणी प्रार्थना केली.

या वेळी सनातनचे देहली येथील संत पू. संजीव कुमार आणि पू. (सौ.) माला कुमार यांची वंदनीय उपस्थिती लाभली. याप्रसंगी बेंगळुरू येथील साधकही या पूजेत सहभागी झाले होते.

ज्याप्रमाणे आपण सत्यनारायण पूजा करतो, त्याचप्रमाणे मनोवांच्छित फलप्राप्तीसाठी श्री सत्यदत्त पूजा केली जाते. सत्यनारायण पूजेनंतर जशी सत्यनारायणाची कथा श्रवण करतो, त्याचप्रमाणे श्री सत्यदत्त कथा श्रवण केली जाते. या पूजेचे पौरोहित्य सनातन वेदपाठशाळेचे श्री. सिद्धेश करंदीकर यांनी केले.

‘श्री सत्यदत्त पूजे’विषयी…

श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ

जुलै २०२४ मध्ये श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांना दत्तावतारी संत प.प. (परमहंस परिव्राजकाचार्य) टेंब्येस्वामी यांचा दृष्टांत झाला. या वेळी स्वामींनी त्यांना सर्व साधकांच्या त्रासांच्या निवारणासाठी सलग ३ पौर्णिमा ‘श्री सत्यदत्त पूजा’ करण्याची आज्ञा दिली. त्याप्रमाणे पहिली पूजा गुरुपौर्णिमेला गोव्यात करण्यात आली. आता दुसरी पूजा बेंगळुरू येथे पार पडली आणि तिसरी पूजा पुढच्या पौर्णिमेला कांचीपूरम् (श्री कामाक्षीदेवी क्षेत्र, तमिळनाडू) येथे संपन्न होणार आहे.

श्री सत्यदत्त पूजेसाठी वापरलेल्या दत्तमूर्तीमागील इतिहास

श्री सत्यदत्त पूजेसाठी केलेली मांडणी

श्री सत्यदत्त पूजेसाठी वापरलेली दत्तमूर्ती ही गेली १२ वर्षे श्रीचित्‌शक्ति (सौ.) गाडगीळ यांचे आई-वडील आणि सनातनचे पू. सदाशिव परांजपे आणि पू. (सौ.) शैलजा परांजपे यांच्याकडे पूजेतील आहे. काही महिन्यांपूर्वी श्रीचित्‌शक्ति (सौ.) गाडगीळ यांच्या आई पू. (सौ.) शैलजा परांजपे यांना झालेल्या दैवी दृष्टांतानुसार त्यांनी ही मूर्ती श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांना दिली.

पू. सदाशिव परांजपे आणि पू. (सौ.) शैलजा परांजपे

पू. सदाशिव परांजपे आणि पू. (सौ.) शैलजा परांजपे यांनी प्रतिदिन केलेल्या भावपूर्ण पूजेमूळे ही दत्तमूर्ती जागृत झाली आहे. गेल्या काही मासांपासून ही दत्तमूर्ती श्रीचित्‌शक्ति (सौ.) गाडगीळ यांच्या कांचीपूरम् येथील निवासस्थानी पूजेत ठेवली आहे.


वैशिष्ट्यपूर्ण !

पूजेच्या वेळी घरात असलेल्या सनातननिर्मित भगवान दत्तात्रेयांच्या चित्राला हार घातला होता. हा हार २० ऑगस्ट या दिवशी उंचीने वाढत वाढत लांब झाला. (छायाचित्र दाखवले आहे.)