श्री दत्ताचे अवतार !

‘पूर्वीच्या काळी भूतलावर स्थूल आणि सूक्ष्म रूपांत आसुरी शक्ती मोठ्या प्रमाणावर वाढल्या होत्या. त्यांना ‘दैत्य’ म्हटले जात असे. देवगणांनी त्या आसुरी शक्तींना नष्ट करण्यासाठी केलेले प्रयत्न अयशस्वी झाले. तेव्हा ब्रह्मदेवाच्या आदेशानुसार वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या रूपांत दत्त देवतेला अवतार घ्यावा लागला. त्यानंतर दैत्य नष्ट झाले. तो दिवस ‘दत्तजयंती’ म्हणून साजरा करतात.’

१६ अवतार !

१. दत्ताचे प्रमुख अवतार

अ. श्रीपाद श्रीवल्लभ

आ. श्री नृसिंह सरस्वती

इ. श्री माणिकप्रभु

ई. श्री स्वामी समर्थ

उ. श्री साईबाबा

ऊ. श्री भालचंद्र महाराज

२. श्रीपाद श्रीवल्लभ हा दत्ताचा पहिला अवतार. यांनी पंधराव्या शतकात महाराष्ट्रात दत्तोपासना चालू केली. श्री नृसिंह सरस्वती हा दत्ताचा दुसरा अवतार. श्री गुरुचरित्रात श्रीपाद श्रीवल्लभ आणि श्री नृसिंह सरस्वती यांची विस्तृत माहिती आहे.

३. दत्ताने एकूण प्रमुख सोळा अवतार घेतले. प.प. वासुदेवानंद सरस्वतीकृत ‘श्रीदत्तात्रेयषोड्शावताराः ।’ यात या अवतारांच्या कथा आहेत.

४. दत्तात्रेयांचे १६ अंशअंशात्मक अवतारही होऊन गेले. यात  यात श्री वासुदेवानंद सरस्वती (प.प. टेंब्येस्वामी) यांचा समावेश आहे.

५. अक्कलकोटचे स्वामी समर्थ : लोकांचा त्रास चुकवण्यासाठी श्री नृसिंह सरस्वती आपल्या शिष्यांना सांगून कर्दलीवनात गेले. तेथे तपश्चर्या करत असतांना त्यांच्या अंगावर मुंग्यांनी वारूळ केले आणि त्यांचे पूर्ण अंग झाकून गेले. कित्येक वर्षांनी एक लाकूडतोड्या त्या वनात लाकडे तोडत असतांना त्याच्या कुर्‍हाडीचा निसटता वार त्या वारुळावर बसला. कुर्‍हाडीच्या पात्याला रक्त लागलेले पाहून तो घाबरला आणि त्याने वारूळ उकरले. त्यातून नृसिंह सरस्वती हे अक्कलकोटस्वामी म्हणून बाहेर पडले. स्वामींचे वास्तव्य अक्कलकोट येथील सध्याच्या मठात औदुंबराखाली असे.


दत्ताचे अलर्क, प्रल्हाद, यदु, सहस्रार्जुन, परशुराम इत्यादी शिष्य प्रसिद्ध आहेत.