श्री दत्ताची रूपे !
‘दत्ताची विविध रूपे आणि विविध नावे आणि त्यानुसार असलेली वस्त्राभूषणे यांपैकी सर्वांना ठाऊक असलेली नावे, म्हणजे दत्तात्रेय, दत्त, गुरुदत्त, अवधूत अशी असून त्याची रूपे एकमुखी-द्विभुज, एकमुखी-चतुर्भुज आणि एकमुखी-षड्भुज, अशी आहेत.
‘दत्ताची विविध रूपे आणि विविध नावे आणि त्यानुसार असलेली वस्त्राभूषणे यांपैकी सर्वांना ठाऊक असलेली नावे, म्हणजे दत्तात्रेय, दत्त, गुरुदत्त, अवधूत अशी असून त्याची रूपे एकमुखी-द्विभुज, एकमुखी-चतुर्भुज आणि एकमुखी-षड्भुज, अशी आहेत.
पूर्वीच्या काळी भूतलावर स्थूल आणि सूक्ष्म रूपांत आसुरी शक्ती मोठ्या प्रमाणावर वाढल्या होत्या. त्यांना ‘दैत्य’ म्हटले जात असे. देवगणांनी त्या आसुरी शक्तींना नष्ट करण्यासाठी केलेले प्रयत्न अयशस्वी झाले. तेव्हा ब्रह्मदेवाच्या आदेशानुसार वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या रूपांत दत्त देवतेला अवतार घ्यावा लागला.
सर्व प्रकृतीविकारांना धुऊन टाकतो, नष्ट करतो, तो अवधूत होय), अशी त्याची ‘सिद्धसिद्धान्तपद्धती’नुसार (६.१) व्याख्या आहे. सर्व प्रकृतीविकार म्हणजे सत्त्व, रज आणि तम हे त्रिगुण. दत्त त्यांना धुऊन टाकतो, म्हणजेच निर्गुणाची अनुभूती देतो.
दत्त गुरुतत्त्वाचे कार्य करत असल्याने सर्व जण मोक्षाला जाईपर्यंत दत्ताचे कार्य चालूच रहाते.
‘दत्त संप्रदायाची काशी’ म्हणून गाणगापूर तीर्थाचे महत्त्व आहे ! श्री नृसिंहसरस्वतींनी त्यांच्या ८० वर्षांच्या कालखंडात १२ वर्षे क्षेत्र नरसोबाची वाडी येथे वास्तव्य केले, तर अत्यंत प्रिय अशा कृष्णा नदीस सोडून नृसिंहसरस्वती भीमा-अमरजा संगमावरील गाणगापूर या क्षेत्रावर २० वर्षे राहिले !
भगवान दत्तात्रेय सद्गुरुपदावर विराजमान असले, तरी ते वृत्तीने सतत ‘शिष्य’ अवस्थेत वावरतात. ‘शिष्य म्हणजे अखंड शिकत रहाणे.’ शिष्याचे मूर्तीमंत उदाहरण म्हणजे भगवान दत्तात्रेय होय.
उपासना करतांना उपासकाला भाव, आनंद आणि शांती यांची अनुभूती येण्यासाठी त्याचा उपास्य देवतेप्रती भाव जागृत होणे महत्त्वाचे असते.
‘२८.११.२०१४ या दिवशी छपाईच्या दृष्टीने सनातन-निर्मित दत्तगुरूंच्या सात्त्विक चित्रात काही पालट करायचे होते. या सेवेत प.पू. डॉक्टरांचे अमूल्य मार्गदर्शन मिळत होते.