शेवगाव (नगर) – योगतज्ञ प.पू. दादाजी वैशंपायन यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या शेवगावच्या दत्तपंढरीत दत्त जन्मोत्सवाचा सोहळा भक्तीभावाने साजरा करण्यात आला. दर्शनासाठी पुष्कळ भाविक येथे आले होते.
दत्तजयंतीच्या दिवशी सकाळी मुख्य संगमरवरी दत्ताच्या मूर्तीवर पंचसूक्त पवमान अभिषेक करण्यात आला. दुपारी पालखी सोहळा झाला. सायंकाळी श्री. दयानंद महाराज कोरेगावकर यांचे दत्त जन्मोत्सवाचे सुश्राव्य कीर्तन झाले. मोनिका राजळे आणि तहसीलदार प्रशांत सांगडे यांच्या हस्ते महारती झाली. प.पू. दादाजी वैशंपायन यांचे सुपुत्र पू. शरदकाका वैशंपायन, त्यांच्या पत्नी सौ. ललिता वैशंपायन, रवींद्र पुसाळकर, वृषाली पुसाळकर, योगतज्ञ प.पू. दादाजी वैशंपायन यांची त्यांच्या देहत्यागापर्यंत सेवा केलेले सनातनचे साधक अतुल पवार, तसेच सांताक्रूझ, मुंबई येथील साधक राजेश मेसवानी या वेळी उपस्थित होते. ‘गुरुदत्त संस्थे’चे अध्यक्ष अर्जुन फडके, सचिव फुलचंद रोकडे यांच्या नेतृत्वाखाली सेवाभावी कार्यकर्त्यांनी उत्सवाच्या यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले. महाप्रसादाने उत्सवाची सांगता झाली.