पुणे महानगरपालिकेकडून समुपदेशकांवर (सल्लागार) ४२ कोटींहून अधिक रुपयांची उधळपट्टी

समुपदेशकांच्या समुपदेशनातून कोणताच लाभ पालिकेला झाला नसल्याचे स्पष्ट होत आहे.

सॅमसंग आस्थापनाच्या प्रमुखाला भ्रष्टाचार प्रकरणी ५ वर्षांची शिक्षा

दक्षिण कोरियातील जगप्रसिद्ध आस्थापन सॅमसंगचे प्रमुख ली जे योंग यांना भ्रष्टाचाराच्या प्रकरणी न्यायालयाने ५ वर्षांची शिक्षा ठोठावली. भ्रष्टाचाराच्या प्रकरणी गेल्या वर्षी दक्षिण कोरियाच्या नेत्या पार्क ग्युन हाय यांना राष्ट्राध्यक्ष पदावरून बडतर्फ करण्यात आले होते.

पनवेलमध्ये वैध मापनशास्त्र यंत्रणेने केलेल्या कारवाईत २५ आस्थापनांविरुद्ध खटले प्रविष्ट

अधिक दराने वस्तूंची विक्री केल्याप्रकरणी आणि मूळ मूल्यात खाडाखोड करून त्यांची विक्री केल्याप्रकरणी अन्न, नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण विभागाच्या अंतर्गत कार्यरत वैध मापनशास्त्र यंत्रणेने पनवेल येथे अनेक आस्थापनांवर कारवाई केली आहे.

मोपलवार यांच्या चौकशीसाठी त्रिसदस्यीय समिती

कथित ध्वनीफीतीमुळे दलालीचे आरोप झालेल्या राधेश्याम मोपलवार यांच्या चौकशीसाठी माजी मुख्य सचिव जॉनी जोसेफ यांच्या अध्यक्षतेखाली त्रिसदस्यीय समिती नेमण्यात आली आहे.

देहली न्यायपालिकेतील न्याय अधिकारी उच्च न्यायालयाकडून बडतर्फ

देहली न्यायपालिकेतील अधिकारी तथा मेघालय उच्च न्यायालयाचे विद्यमान न्यायमूर्ती व्ही.पी. वैश यांचे पुत्र नितेश गुप्ता यांना देहली उच्च न्यायालयाने नुकतेच बडतर्फ केले.

राजारामपुरी पोलीस ठाण्यातील पोलीस हवालदार किरण गवळी यांना १ सहस्र रुपयांची लाच घेतांना अटक !

५ सहस्र रुपयांची लाच घेतल्याप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पोलिसांनी राजारामपुरी पोलीस ठाण्यातील पोलीस हवालदार किरण गवळी यांना पोलीस ठाण्यातच अटक केली.

क्रेनच्या दंडाच्या बनावट पावत्या जलनिःस्सारणमध्ये टाकतांना शहर वाहतूक शाखेतील पोलिसाला नागरिकांनी पकडले !

खोट्या पावत्यांद्वारे वाहनधारकांच्या लुटीचा प्रकार १४ ऑगस्टला उघडकीस आला.

भारतीय चलनातून बाद केलेल्या नोटा बाळगणार्‍या धर्मांधाला अटक

भारतीय चलनातून बाद केलेल्या नोटा बाळगणारा नालासोपारा येथील धर्मांध जफर अहमद मोहमद शेख याला मुंब्रा पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्याकडून ४९ लाख ३९ सहस्त्र रुपयांच्या चलनातून बाद केलेल्या नोटा हस्तगत केल्या आहेत.

पैसा पांढरा करण्यासाठी राज्यातील ८ उच्चपदस्थ अधिकार्‍यांची बोगस गुंतवणूक – आमदार अनिल गोटे

राधेश्याम मोपलवार, सुरेश काकाणी, विजय नाहाटा, विजय अग्रवाल, सतीश सोनी, चुनीवाल चंदन, शेखर चन्ने, किरण कुरुंदकर या राज्यातील ८ आजी-माजी आयएएस् आणि बिगर आयएएस् …….

लाच मागणार्‍या डहाणू पोलीस ठाण्यातील हवालदारांवर गुन्हा प्रविष्ट

न्यायालयात दोषारोपपत्र प्रविष्ट करतांना गुन्ह्याचे गांभीर्य न्यून करण्यासाठी तक्रारदाराकडे १० सहस्र रुपयांची लाच मागणारे डहाणू पोलीस ठाण्याचे हवालदार सुगंध नरसुळे आणि माणिक जाधव यांच्यावर गुन्हा प्रविष्ट करण्यात आला आहे.


Multi Language |Offline reading | PDF