महानंद दूध महासंघावर प्रशासकाची नियुक्ती करणार !
मुंबई येथील महाराष्ट्र राज्य दूध महासंघ मर्यादित असलेल्या महानंद दूध महासंघात अपप्रकार आणि उतरती कळा लागण्याला संचालक मंडळ उत्तरदायी आहे. महासंघातील अनियमिततेविषयी सरकार बघ्याची भूमिका घेणार नाही.
मुंबई येथील महाराष्ट्र राज्य दूध महासंघ मर्यादित असलेल्या महानंद दूध महासंघात अपप्रकार आणि उतरती कळा लागण्याला संचालक मंडळ उत्तरदायी आहे. महासंघातील अनियमिततेविषयी सरकार बघ्याची भूमिका घेणार नाही.
टंचाईच्या काळात पाणीपुरवठ्याच्या नावाखाली जनतेची लूट करणार्यांवर मागील वर्षभरात कारवाई का झाली नाही ? असे प्रकार अन्य जिल्ह्यात होऊ नयेत, यासाठी विभागाने सतर्क असणे आवश्यक आहे
अटक करण्यात आलेल्या लाचखोर अधिकार्यांची संख्या एवढी असेल, तर अटक न झालेले किती असतील, याचा विचारही न केलेला बरा ! प्रशासन भ्रष्टाचाराची बजबजपुरी झाल्याचे हे द्योतक आहे !
अनेक गोष्टी विनामूल्य देण्याचे आमीष देऊन सरकार स्थापन झाले, तरी ते चालवण्यासाठी लागणारी नीतीमत्ता आपकडे दिसलेली नाही, हेच सत्य आहे ! बाकी राजकारण आणि भ्रष्टाचार या एकाच नाण्याच्या २ बाजू झालेल्या आहेत. आपचे सरकारही त्याला अपवाद राहिलेले नाही, हे पुन: पुन्हा समोर येत आहे !
देशात होणारे कोट्यवधी रुपयांचे घोटाळे रोखण्यासाठी कठोर शिक्षा असलेले कायदे सिद्ध करून त्यांची तात्काळ प्रभावी कार्यवाही करायला हवी !
एका अधिकार्याकडे इतकी संपत्ती सापडते, तर अन्य अधिकार्यांकडे किती संपत्ती असेल आणि देशातील सर्वच सरकारी अधिकार्यांची पडताळणी केली, तर किती बेहिशोबी संपत्ती मिळेल, याची कल्पनाच करता येत नाही !
चौकशीविषयी हिंदु विधीज्ञ परिषदेकडून सरकारकडे विचारणा !
पोलीस विभागातील भ्रष्टाचारच संपत नाही, हे दुर्दैवी आणि संतापजनक ! लाचखोर पोलिसांना अन्यांच्या तुलनेत अधिक कठोर शिक्षा द्यायला हवी !
आपल्याला आपल्या सामर्थ्यांवर लक्ष केंद्रित करायला हवे. देश यापुढे ‘पंचप्राण’ आणि मोठे संकल्प घेऊन पुढे जाणार आहे. भारताची ‘विकसित राष्ट्र’ म्हणून ओळख निर्माण करायची आहे. हा पहिला प्राण आहे. दुसरा प्राण गुलामीचा अंश बाहेर काढणे, हा आहे.
प्रतिदिन सकाळी दैनिक उघडले की, कुणालातरी अटक आणि कोट्यवधींचा भ्रष्टाचार अशाच बातम्या वाचायला मिळतात. या व्यक्तींविरुद्ध फौजदारी गुन्हे नोंद व्हावेत. तसेच त्यांची स्थावर जंगम मालमत्ताही सरकारने कह्यात घ्यावी.