डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरणात ५ जणांवर आरोप निश्चित !
डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरणात पुणे न्यायालयाने ५ जणांवर आरोप निश्चित केले आहेत. या वेळी पाचही आरोपींनी न्यायालयात ते निर्दोष असल्याचे सांगितले. या प्रकरणाची पुढील सुनावणी ३० सप्टेंबर या दिवशी होणार आहे.