पाकिस्तानकडे भाजीपाला खरेदी करण्यासाठी पैसे नाहीत !
‘भाजीपालाही सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर जाईल’, अशी चिंता ‘फेडरेशन ऑफ पाकिस्तान चेंबर्स ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री’चे कार्यवाहक अध्यक्ष सुलेमान चावला यांनी व्यक्त केली आहे.
‘भाजीपालाही सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर जाईल’, अशी चिंता ‘फेडरेशन ऑफ पाकिस्तान चेंबर्स ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री’चे कार्यवाहक अध्यक्ष सुलेमान चावला यांनी व्यक्त केली आहे.
जागतिक बँकेने प्रकाशित केलेल्या अहवालात भारत आधीपासून उष्णतेचा सामना करत आहे. येणार्या उन्हाळ्यापूर्वीच उन्हाळा चालू होणार असून त्याची तीव्रता पूर्वीपेक्षा अधिक असणार आहे’, असा दावा केला आहे. ‘भारत जगातील पहिला देश असेल, ज्यामध्ये उष्णता मनुष्याला सहन करण्याच्या पलीकडे असणार आहे’, असेही यात म्हटले आहे.
वास्तविक असा निर्णय घेतलाच कसा ? हे अधिकोष पाकिस्तानात आहे का ? हिंदुत्वनिष्ठ संघटनांनी तक्रार नोंदवली नसती, तर हे असेच चालू राहिले असते. शुक्रवारची सुटी घोषित करणार्यांवर प्रथम कारवाई करा !
बँकेत कोट्यवधी रुपयांचा अपहार करणार्यांना कठोर शिक्षा द्यायला हवी !
नियमांचे उल्लंघन करणे आणि आर्थिक अनियमिततेमुळे तोट्यात आलेल्या रूपी सहकारी बँकेला वाचवण्याचे न्यायालयीन आणि केंद्रीय अर्थ मंत्रालयातील सर्व प्रयत्न अयशस्वी ठरल्याने ही बँक इतिहासजमा होणार आहे.
बँकेच्या महिला व्यस्थापक (मॅनेजर) पूनम गुप्ता यांनी धाडसाने त्या चोराचा सामना केला. गुप्ता यांची आक्रमकता पाहून चोर हतबल झाला.
यू-ट्यूबवर प्रसारित झालेल्या ‘एयू स्मॉल फायनान्स बँके’च्या विज्ञापनामध्ये हिंदु धर्मातील परंपरेचा अवमान करण्यात आला आहे. यामध्ये विवाहानंतर घरजावई बनवलेला वर (आमीर खान) आणि वधू (कियारा आडवाणी) यांना गृहप्रवेश करतांना दाखवले आहे.
बँक दरोड्याच्या गुन्हेगारीवर आधारित वेब सीरीज आणि चित्रपट पाहून येथील आयसीआयसीआय बँकेच्या तिजोरी संरक्षक व्यवस्थापक अल्ताफ शेख (वय ४३ वर्षे) याने बँकेची तिजोरी लुटली. ११ वर्षे एकाच बँकेत काम करत असल्याने त्याला बँकेच्या तिजोरीसह अन्य गोष्टींचीही माहिती होती.
‘रूपी बँके’तील गैरव्यवहार उघडकीस आल्यानंतर प्रशासकाद्वारे बँकेचे कामकाज चालू होते. वर्ष २०१३ मध्ये निर्बंध घातले. तत्कालिन १५ संचालकांसह इतर अधिकारी मिळून ६९ जणांविरोधात चुकीच्या पद्धतीने कर्जवाटप आणि गैरव्यवहार केल्याप्रकरणी गुन्हे नोंदवण्यात आले.
कर्नाळा नागरी सहकारी बँकेतील आर्थिक घोटाळ्याची व्याप्ती मोठी आहे. या अधिकोषाचे अध्यक्ष सध्या अंमलबजावणी संचालनालयाच्या कोठडीत असून त्यांची चौकशी चालू आहे.