डोंबिवली येथील आयसीआयसीआय बँकेच्या धर्मांध तिजोरी संरक्षक व्यवस्थापकाने १२ कोटी रुपये लुटले !

आरोपी अल्ताफ शेख

डोंबिवली – बँक दरोड्याच्या गुन्हेगारीवर आधारित वेब सीरीज आणि चित्रपट पाहून येथील आयसीआयसीआय बँकेच्या तिजोरी संरक्षक व्यवस्थापक अल्ताफ शेख (वय ४३ वर्षे) याने बँकेची तिजोरी लुटली. ११ वर्षे एकाच बँकेत काम करत असल्याने त्याला बँकेच्या तिजोरीसह अन्य गोष्टींचीही माहिती होती. त्याने तिजोरीतील ३४ कोटी रक्कम लुटण्याचा प्रयत्न केला. या रकमेतील १२ कोटींची रक्कम त्याने सहकार्‍यांच्या  साहाय्याने लुटली. हा प्रकार उघड झाल्यानंतर तो फरार झाला; पण ४ मासांनंतर त्याला पोलिसांनी पुणे येथून अटक केली. त्याचे सहकारी आरोपी अबरार कुरेशी (वय ३३ वर्षे), अहमद खान (वय ३३ वर्षे), अनुज गिरी (वय ३० वर्षे) यांना पोलिसांनी यापूर्वीच अटक केली आहे. या चोरीचा प्रमुख व्यवस्थापक अल्ताफ शेख होता. (धर्मांधांना महत्त्वाचे दायित्व दिल्यावर काय होते, ते यावरून लक्षात येते. – संपादक)

१. तिजोरी लुटण्याचा निर्णय घेतल्यानंतर अल्ताफने लुटीची रक्कम कुठे ठेवायची ? तिजोरी कशी फोडायची ? ती रक्कम बँकेतून सीसीटीव्हीला चकवा देऊन कशी बाहेर काढायची ? हे सर्व नियोजन वेब सिरीजचा अभ्यास करून सिद्ध केले.

२. बँकेच्या सीसीटीव्हीची दिशा पालटून आणि धोक्याची चेतावणी देणारा भोंगा निष्क्रीय करून वातानुकूलित यंत्राच्या एका बाजूला मोठे छिद्र पाडून त्यामधून तिजोरीतील ३४ कोटी रक्कम बाहेर टाकण्याचा निर्णय घेतला.