आमची बँकींग प्रणाली पूर्णपणे सुरक्षित ! – राष्ट्राध्यक्ष जो बायडेन

सिलिकॉन व्हॅली आणि सिग्नेचर बँक दिवाळखोर झाल्यानंतरही अमेरिकेतील बँकींग प्रणाली पूर्णपणे सुरक्षित आहे, असा दावा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी केला.

अमेरिकेत आता सिग्नेचर बँकेला टाळे !

अमेरिकेत सिलिकॉन व्हॅली बँकेपाठोपाठ आता सिग्नेचर बँकेला टाळे ठोकण्यात आले आहे. सिग्नेचर ही न्यूयॉर्कमधील एक प्रादेशिक बँक आहे. सप्टेंबर २०२२ पर्यंत सिग्नेचर बँकेच्या धनसंचयापैकी एक चतुर्थांश वाटा हा ‘क्रिप्टो करन्सी’ अर्थात् अभासी चलनाचा होता.

पुन्हा मंदीचे सावट ?

भारताने अमेरिकेवर किती अवलंबून रहायचे ? हे ठरवण्याची वेळ आली आहे. भारताकडे विपुल साधन-संपत्ती आणि नैसर्गिक संसाधने आहेत. त्यामुळे स्वतंत्र धोरण आणि धर्माधारित विकासाचे नियोजन करून त्यावर मार्गक्रमण चालू ठेवावे.

मुंबईमध्ये बनावट संदेशाद्वारे ४० नागरिकांच्या बँक खात्यांमधून लाखो रुपयांची लुट !

मागील आठवडाभरात बनावट संदेश पाठवून मुंबईतील विविध खासगी अधिकोषांतील (बँकांतील) ४० जणांच्या खात्यांमधून लाखो रुपये लुटल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

विनोदी कलाकार तन्मय भट यांचा सहभाग असणारे विज्ञापन ‘कोटक महिंद्रा बँके’ने घेतले मागे !

अशांवर गुन्हा नोंद करून त्यांना कारागृहात का डांबले जात नाही ?

हसन मुश्रीफ अध्यक्ष असलेल्या कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या विविध शाखांवर ‘ईडी’ची धाड !

‘गोडसाखर’ साखर कारखान्यामध्ये अवैध १०० कोटी रुपयांची गुंतवणूक असल्याचा आरोप हसन मुश्रीफ यांच्यावर करण्यात आला आहे. तसेच ११ जानेवारीला हसन मुश्रीफ यांचे कागल, पुणे येथील निवासस्थान यांच्यावरही धाड टाकण्यात आली होती.

महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाच्या वतीने कर्णावती (गुजरात) येथील आयडीबीआय बँकेत ‘मानसिक आरोग्य आणि भावनिक संतुलन’ या विषयावर व्याख्यान

‘आयडीबीआय बँके’च्या वतीने ‘निरोगी रहाणीमान आणि यशस्वी व्यावसायिक अन् वैयक्तिक जीवन’ या विषयावर ‘ऑनलाइन’ प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले होते.

‘स्टॉक एक्सचेंज’ (समभाग विक्री बाजार) आणि ‘सेबी’ यांचे डोळे उघडणारा ‘कार्वी’चा महाघोटाळा !

‘सेबी’ने दिलेल्या माहितीनुसार ‘कार्वी स्टॉक ब्रोकिंग’ने ग्राहकांच्या खात्यातील समभाग विकून १ सहस्र ९६ कोटी रुपये त्यांच्या समूहाचे आस्थापन असलेल्या ‘कार्वी रिॲल्टी’मध्ये हस्तांतरण केले.

‘युपीआय’वरील आर्थिक व्यवहाराच्या मर्यादा निश्‍चित

‘नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया’च्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार, एखादी व्यक्ती आता ‘युपीआय’द्वारे प्रतिदिन केवळ १ लाख रुपयांपर्यंतचे व्यवहार करू शकणार आहे.