युगांडात कर्जावरून पोलिसाने बँकेच्या भारतीय अधिकार्‍याची केली हत्या !

बँकेत कार्य करणार्‍या उत्तम भंडारी नावाच्या एका भारतीय अधिकार्‍याची एके-४७ बंदुकीद्वारे गोळ्या झाडून हत्या करण्यात आली आहे.

भीमा पाटस सहकारी साखर कारखान्‍याकडे पी.डी.सी.सी. बँकेचे १०० कोटींहून अधिक रुपयांचे कर्ज थकीत !

दौंड तालुक्‍यातील भीमा पाटस सहकारी साखर कारखान्‍याकडे पुणे जिल्‍हा मध्‍यवर्ती सहकारी बँकेचे (पी.डी.सी.सी.) अंदाजे १०० कोटी रुपयांहून अधिकचे कर्ज थकीत आहे.

बांधकाम व्यावसायिक डी.एस्. कुलकर्णी यांच्यावर सीबीआयकडून २ गुन्हे नोंद !

येथील प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक दीपक कुलकर्णी (डी.एस्.के.) यांच्या विरोधात सीबीआयने दोन गुन्हे नोंद केले आहेत. त्यांच्यावर ५८० कोटी रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप आहे. १ जुलै २०२० या दिवशी स्टेट बँकेने दिलेल्या पत्राच्या आधारे पहिला गुन्हा नोंद केला आहे.

रिझर्व्ह बँकेकडून ६ सहकारी बँकांवर दंडात्मक कारवाई !      

बँकिंग नियमन कायदा १९५० चे उल्लंघन आणि ठेवींवरील व्याजदराशी निगडित रिझर्व्ह बँकेच्या नियमांचे पालन न केल्याप्रकरणी ही कारवाई करण्यात आली आहे.

‘केडीसीसी’ बँकेतील उद्धट कर्मचार्‍यांनी त्‍यांचे वागणे पालटले नाही, तर धडा शिकवू !

निवृत्ती चौक या ठिकाणी असणार्‍या ‘केडीसीसी’ (कोल्‍हापूर जिल्‍हा मध्‍यवर्ती) बँकेमधील कर्मचारी सेवानिवृत्त वयोवृद्ध नागरिकांना अपमानकारक वागणूक देत असल्‍याच्‍या, तसेच बँकेतील सुविधांचा लाभ देत नसल्‍याच्‍या तक्रारी भाजपकडे आल्‍या होत्‍या.

नवी मुंबई महानगरपालिकेच्या शैक्षणिक शिष्यवृत्ती योजनेत ७१ सहस्र ३१५ अर्ज प्राप्त !

२८ फेब्रुवारी ही या योजनेसाठी अर्ज सादर करण्याची अंतिम दिनांक होती. मार्चअखेर एका वर्षाची शिष्यवृत्तीची रक्कम विद्यार्थ्यांच्या बँकेच्या खात्यावर जमा करण्यात येणार आहे. त्यानंतर दुसर्‍या वर्षाच्या शिष्यवृत्तीची रक्कम जमा करण्यात येणार आहे.

आमची बँकींग प्रणाली पूर्णपणे सुरक्षित ! – राष्ट्राध्यक्ष जो बायडेन

सिलिकॉन व्हॅली आणि सिग्नेचर बँक दिवाळखोर झाल्यानंतरही अमेरिकेतील बँकींग प्रणाली पूर्णपणे सुरक्षित आहे, असा दावा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी केला.

अमेरिकेत आता सिग्नेचर बँकेला टाळे !

अमेरिकेत सिलिकॉन व्हॅली बँकेपाठोपाठ आता सिग्नेचर बँकेला टाळे ठोकण्यात आले आहे. सिग्नेचर ही न्यूयॉर्कमधील एक प्रादेशिक बँक आहे. सप्टेंबर २०२२ पर्यंत सिग्नेचर बँकेच्या धनसंचयापैकी एक चतुर्थांश वाटा हा ‘क्रिप्टो करन्सी’ अर्थात् अभासी चलनाचा होता.

पुन्हा मंदीचे सावट ?

भारताने अमेरिकेवर किती अवलंबून रहायचे ? हे ठरवण्याची वेळ आली आहे. भारताकडे विपुल साधन-संपत्ती आणि नैसर्गिक संसाधने आहेत. त्यामुळे स्वतंत्र धोरण आणि धर्माधारित विकासाचे नियोजन करून त्यावर मार्गक्रमण चालू ठेवावे.

मुंबईमध्ये बनावट संदेशाद्वारे ४० नागरिकांच्या बँक खात्यांमधून लाखो रुपयांची लुट !

मागील आठवडाभरात बनावट संदेश पाठवून मुंबईतील विविध खासगी अधिकोषांतील (बँकांतील) ४० जणांच्या खात्यांमधून लाखो रुपये लुटल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.