मुंबई – येत्या ३० सप्टेंबर या दिवशी २ सहस्र रुपयांच्या नोटा बँकेत जमा करण्याचा शेवटचा दिनांक असणार आहे. या मुदतीपर्यंत जर या नोटा बँकेत जमा करता आल्या नाहीत, तर या नोटा कायदेशीर रहातील; मात्र त्याचा व्यवहाराच्या उद्देशाने स्वीकार केला जाणार नाही.
या नोटा केवळ रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया मध्येच पालटून दिल्या जातील; मात्र त्या वेळी ‘विहित कालावधीत नोटा का पालटून घेतल्या नाहीत ?’, असे स्पष्टीकरण द्यावे लागणार आहे. २ सहस्र रुपयांच्या नोटा बंद होणार असल्याची घोषणा मे मासामध्ये करण्यात आली होती.