रिझर्व्ह बँकेकडून कोल्हापुरातील शिवम सहकारी बँकेचा परवाना रहित

भारतीय रिझर्व्ह बँकेने शहरातील शिवम सहकारी बँकेचा बँकिंग परवाना रहित केला आहे. बँकेकडे पुरेसे भांडवल नसल्याने बँकेने ही कारवाई केली आहे. या बँकेतील ९९ टक्क्यांहून अधिक ठेवीदारांना ठेवीवर विमा संरक्षण आहे.

ओमकार ग्रूपच्या अध्यक्षांना अटक

ओमकार बिल्डरच्या कार्यालयावर सक्तवसुली संचालनालयाने धाड टाकून अध्यक्ष कमल गुप्ता आणि संचालक बाबूलाल वर्मा यांना अटक केली आहे.

‘स्कूल गेम्स फेडरेशन’ची बनावट बँक खाती उघडून विविध राज्यांतील क्रीडा विभागांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक !

फेडरेशनचे माजी महासचिव राजेश मिश्रा यांनी बनावट ‘पॅन कार्ड’ आणि बँक खाते क्रमांक यांद्वारे ही फसवणूक केली आहे. यात महाराष्ट्राच्या क्रीडा विभागाची ८६ लाख रुपयांची फसवणूक झाली आहे.

अंमलबजावणी संचालनालयाची हितेंद्र ठाकूर यांच्या विवा समुहाच्या ६ ठिकाणांवर धाडी

पंजाब आणि महाराष्ट्र को-ऑपरेटिव्ह बँक घोटाळ्यातील पैशांच्या देवाण-घेवाण (मनी लॉन्ड्रिंग) प्रकरणात अन्वेषण करत असलेल्या अंमलबजावणी संचालनालयाच्या पथकाने २२ जानेवारी या दिवशी मीरा-भाईंदर, वसई-विरार परीसरांत धाडी घातल्या.

७१ सहस्र कोटींच्या घोटाळ्याच्या प्रकरणी पुण्यातील सहकारी बँकेवर अंमलबजावणी संचालनालयाची धाड

घडणार्‍या गुन्ह्यांत राष्ट्रवादीचे पदाधिकारी, नेते सापडण्याचे प्रमाणे अधिक असल्याने गुन्हेगारांचा भरणा असलेला पक्ष असे नाव दिल्यास त्यात चूक काय ?

वर्षा राऊत यांनी ५५ लाख रुपये परत केले

वर्षा राऊत यांनI आवश्यकता भासल्यास पुन्हा एकदा चौकशीसाठी बोलावले जाणार आहे

नांदेड येथे शंकर नागरी सहकारी बँकेत १४ कोटी रुपयांचा ऑनलाईन दरोडा ! 

आयडीबीआय बँकेचे शाखा व्यवस्थापक रूपेश कोडगिरे यांनी काहीही बोलण्यास नकार दिला.

पुणे येथील बजाज फायनान्स आस्थापनाला रिझर्व्ह बँकेकडून अडीच कोटी रुपयांचा दंड

नॉन बँकिंग वित्तीय सेवा देणार्‍या बजाज फायनान्स आस्थापनाला NBFC प्रॅक्टिस कोडच्या नियमांचे उल्लंघन केल्यामुळे रिझर्व्ह बँकेने अडीच कोटी रुपये दंड आकारला आहे.

अन्वेषण यंत्रणांना माहिती देणे, हे आमचे कर्तव्य ! – खासदार संजय राऊत, शिवसेना

पीएमसी बँक आर्थिक घोटाळ्याच्या प्रकरणी अंमलबजावणी संचालनालयाकडून संजय राऊत यांच्या पत्नी सौ. वर्षा राऊत यांची चौकशी करण्यात आली. त्यावर संजय राऊत यांनी वरील प्रतिक्रिया व्यक्त केली.

आर्थिक अपहाराचे आरोप पुराव्यानिशी सिद्ध करा, अन्यथा कायदेशीर कारवाई करीन ! – खासदार संजय राऊत, शिवसेना

आर्थिक घोटाळ्यामध्ये माझ्या कुटुंबियांचे नाव विनाकारण गोवण्यात आले आहे. मी आव्हान देतो की, पुराव्यानिशी ते सिद्ध करा, नाहीतर कायदेशीर कारवाईला सिद्ध रहा, अशी चेतावणी शिवसेनेचे नेते आणि खासदार संजय राऊत यांनी ‘ट्वीट’द्वारे दिली आहे.