हिरे व्यापारी मेहूल चोक्सीची १४ कोटी रुपयांची संपत्ती जप्त !

येथील पंजाब नॅशनल बँकेतील १३ सहस्र कोटी रुपयांपेक्षा अधिक रकमेच्या घोटाळ्याप्रकरणी अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) मनी लॉन्ड्रिंग प्रिव्हेंशन अ‍ॅक्टअंतर्गत गीतांजली ग्रुप आणि याचे प्रमोटर मेहूल चोक्सी यांची येथील १४ कोटी रुपयांची संपत्ती जप्त केली आहे.

पुणे येथील सेवा विकास सहकारी अधिकोषाला ठोठावला ५५ लाख रुपयांचा दंड, भारतीय रिझर्व्ह बँकेची कारवाई

अधिकोषाच्या नियमनातील त्रुटीमुळे आरबीआयने हा सेवा दंड ठोठावला आहे. नियमांचे पालन न केल्याने दंड का ठोठावू नये, अशी कारणे दाखवा नोटीस आरबीआयने सेवा विकास सहकारी अधिकोषाला बजावली होती.

रिझर्व्ह बँकेकडून कोल्हापुरातील शिवम सहकारी बँकेचा परवाना रहित

भारतीय रिझर्व्ह बँकेने शहरातील शिवम सहकारी बँकेचा बँकिंग परवाना रहित केला आहे. बँकेकडे पुरेसे भांडवल नसल्याने बँकेने ही कारवाई केली आहे. या बँकेतील ९९ टक्क्यांहून अधिक ठेवीदारांना ठेवीवर विमा संरक्षण आहे.

ओमकार ग्रूपच्या अध्यक्षांना अटक

ओमकार बिल्डरच्या कार्यालयावर सक्तवसुली संचालनालयाने धाड टाकून अध्यक्ष कमल गुप्ता आणि संचालक बाबूलाल वर्मा यांना अटक केली आहे.

‘स्कूल गेम्स फेडरेशन’ची बनावट बँक खाती उघडून विविध राज्यांतील क्रीडा विभागांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक !

फेडरेशनचे माजी महासचिव राजेश मिश्रा यांनी बनावट ‘पॅन कार्ड’ आणि बँक खाते क्रमांक यांद्वारे ही फसवणूक केली आहे. यात महाराष्ट्राच्या क्रीडा विभागाची ८६ लाख रुपयांची फसवणूक झाली आहे.

अंमलबजावणी संचालनालयाची हितेंद्र ठाकूर यांच्या विवा समुहाच्या ६ ठिकाणांवर धाडी

पंजाब आणि महाराष्ट्र को-ऑपरेटिव्ह बँक घोटाळ्यातील पैशांच्या देवाण-घेवाण (मनी लॉन्ड्रिंग) प्रकरणात अन्वेषण करत असलेल्या अंमलबजावणी संचालनालयाच्या पथकाने २२ जानेवारी या दिवशी मीरा-भाईंदर, वसई-विरार परीसरांत धाडी घातल्या.

७१ सहस्र कोटींच्या घोटाळ्याच्या प्रकरणी पुण्यातील सहकारी बँकेवर अंमलबजावणी संचालनालयाची धाड

घडणार्‍या गुन्ह्यांत राष्ट्रवादीचे पदाधिकारी, नेते सापडण्याचे प्रमाणे अधिक असल्याने गुन्हेगारांचा भरणा असलेला पक्ष असे नाव दिल्यास त्यात चूक काय ?

वर्षा राऊत यांनी ५५ लाख रुपये परत केले

वर्षा राऊत यांनI आवश्यकता भासल्यास पुन्हा एकदा चौकशीसाठी बोलावले जाणार आहे

नांदेड येथे शंकर नागरी सहकारी बँकेत १४ कोटी रुपयांचा ऑनलाईन दरोडा ! 

आयडीबीआय बँकेचे शाखा व्यवस्थापक रूपेश कोडगिरे यांनी काहीही बोलण्यास नकार दिला.

पुणे येथील बजाज फायनान्स आस्थापनाला रिझर्व्ह बँकेकडून अडीच कोटी रुपयांचा दंड

नॉन बँकिंग वित्तीय सेवा देणार्‍या बजाज फायनान्स आस्थापनाला NBFC प्रॅक्टिस कोडच्या नियमांचे उल्लंघन केल्यामुळे रिझर्व्ह बँकेने अडीच कोटी रुपये दंड आकारला आहे.