राजकीय सोयीसाठी आतंकवाद्यांचे ‘चांगले किंवा वाईट’, असे वर्गीकरण करण्याचे युग संपले पाहिजे !

आतंकवाद्यांचे चांगले किंवा वाईट, असे वर्गीकरण आतंकवादाच्या विरोधात लढण्याच्या कटीबद्धतेला दुर्बल करते, अशा शब्दांत भारताने संयुक्त राष्ट्रांत पाकला त्याचे नाव न घेता फटकारले.

रशियाच्या आक्रमणामुळे युक्रेनच्या ओडेशा शहरातील वीजपुरवठा खंडित !

‘वीज पुरवठा पूर्ववत् होण्यास अनेक दिवस लागण्याची शक्यता आहे’, असे युक्रेनचे राष्ट्रपती व्लोदिमिर झेलेंस्की यांनी सांगितले आहे.

रंगारेड्डी (तेलंगाणा) येथे डॉक्टर तरुणीचे १०० जणांनी घरात घुसून केले अपहरण !

एका डॉक्टर तरुणीचे अशा प्रकारे अपहरण करण्याचे धाडस होतेच कसे ? राज्यात कायदा आणि सुव्यवस्था नावाचा प्रकार आहे कि नाही ?

हिंगोली येथे गोतस्करांकडून पोलिसांवर दगडफेक !

आरोपींच्या वाहनावर समोरच्या बाजूने संभाजीनगर येथील वाहन क्रमांक, तर पाठीमागच्या बाजूने नांदेड येथील क्रमांक आहे. त्यामुळे ‘हे वाहन चोरीचे असावे’, असा पोलिसांना संशय आहे.

पंजाबमध्ये पोलीस ठाण्यावर रॉकेट लाँचरद्वारे आक्रमण

पंजाबमध्ये आम आदमी पक्षाचे सरकार आल्यापासून खलिस्तानी आतंकवाद्यांच्या कारवायांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. हे पहाता केंद्र सरकारने आताच कठोर पावले उचलण्याची आवश्यकता आहे !

व्हिसा संपलेल्या लाखो विदेशी नागरिकांचे भारतात अवैध वास्तव्य !

भारतात अवैधपणे रहाणार्‍या विदेशी नागरिकांवर केंद्र सरकारचे नियंत्रण कसे नाही ? त्यांची संख्या लाखोंच्या घरात जाईपर्यंत सरकारी यंत्रणा काय करत होत्या ?

गोरक्षकांवरील आक्रमणाच्या निषेधार्थ जुन्नर (जिल्हा पुणे) येथे निषेध मोर्चा

येथे भरवस्तीत जमावाने गोरक्षकांवर केलेल्या आक्रमणाच्या निषेधार्थ ८ डिसेंबर या दिवशी निषेध मोर्चा काढण्यात आला, तसेच शहरात सकाळपासून कडकडीत बंद पाळण्यात आला.

कोल्हापूर-बेळगाव बससेवा पूर्ववत् !

मंत्र्यांनी बेळगावमध्ये येऊ नये, यासाठी मागील ५ दिवसांपासून कन्नड संघटनांनी कर्नाटक राज्यात अनेक ठिकाणी आंदोलन केले होते.

बांगलादेशमध्ये २०० वर्षे जुन्या हिंदु मंदिराची अज्ञातांकडून तोडफोड !

इस्लाममध्ये मूर्तीपूजा हराम असल्याने भारताच्या गेल्या १ सहस्र २०० वर्षांच्या इतिहासात मुसलमान आक्रमकांकडून आणि नंतर बाटलेल्यांकडून हिंदूंच्या देवतांच्या मूर्ती आणि मंदिरे यांची तोडफोड होतच आहे ! ही स्थिती हिंदु राष्ट्राची स्थापना झाल्यावरच पालटू शकते !

महाराष्ट्राच्या गाड्या फोडणार्‍यांवर कर्नाटक सरकारने कारवाई करावी ! – एकनाथ शिंदे, मुख्यमंत्री

महाराष्ट्र आणि कर्नाटक सीमाभागाचा प्रश्‍न सर्वोच्च न्यायालयात आहे. त्यामुळे याविषयी संयम पाळायला हवा. यावर तोडगा निघेल; परंतु सीमाभागात मराठी भाषिकांना कोणताही त्रास होता कामा नये.