कोल्हापूर-बेळगाव बससेवा पूर्ववत् !

कोल्हापूर, ९ डिसेंबर (वार्ता.) – मागील ७२ घंट्यांपासून बंद असलेली महाराष्ट्र आणि कर्नाटक बससेवा पूर्ववत् झाली आहे. त्यामुळे सीमाभागांसह कर्नाटकात प्रवास करणार्‍या प्रवाशांची गैरसोय टळली आहे. सीमावादामुळे दोन्ही राज्यांतील बससेवेवर विपरीत परिणाम झाला होता.

राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ४ वरील हिरे बागेवाडीजवळ राज्यातील वाहनांना लक्ष्य करण्यात आले होते. या वेळी वाहनांची मोठ्या प्रमाणात तोडफोड करण्यात आली. सीमा समन्वयक मंत्र्यांची नेमणूक केल्यानंतर मंत्री चंद्रकांत पाटील आणि शंभूराज देसाई बेळगावला जाऊन ‘महाराष्ट्र एकीकरण समिती’ची भेट घेणार होते; मंत्र्यांनी बेळगावमध्ये येऊ नये, यासाठी मागील ५ दिवसांपासून कन्नड संघटनांनी कर्नाटक राज्यात अनेक ठिकाणी आंदोलन केले होते.